'छोटी बहू' फेम रुबिना दिलैक अडकली विवाहबंधनात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

ऑफ व्हाइट आणि त्यावर लाइट पिंक कलरची फुले असा लेहंगा रुबिनाने परिधान केला होता.

टेलिव्हिजनची प्रसिध्द अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला यांची लव्हस्टोरी कायमच चर्चेत होती. या टी. व्ही. कपलच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचा गाजावाजा कधी होणार याबद्दल उत्सुकता होतीच. 2015 पासून हे दोघं डेट करत आहे आणि नुकताच ते विवाहबंधनात अडकलेही आहेत. 
 

काल (ता. 21 जून) गुरुवारी कुटूंबिय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत शिमला येथे हा विवाहसोहळा पार पडला. ऑफ व्हाइट आणि त्यावर लाइट पिंक कलरची फुले असा लेहंगा रुबिनाने परिधान केला होता. तर अभिनव लाइट ग्रीन शेरवानीत रुबाबदार दिसत होता. या कपलने आपल्या नात्याबद्दल कधीच लपविण्याचा प्रयत्न केला नाही. 
 

'छोटी बहू' या टी. व्ही. मालिकेतून रुबिना घराघरात पोहोचली. 'शक्ती - अस्तित्व के एहसास की' मालिकेत रुबिनानं साकारलेल्या तृतीयपंथीयाच्या भूमिकेला विशेष पसंत केले गेले. तर अभिनव शुक्ला टेलिव्हिजन अभिनेता आणि फोटोग्राफर आहे.  
 

 

 

 


 


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Actress Rubina Dilaik And Actor Abhinav Shuklas Wedding Photos