'साहो' च्या या अभिनेत्रीनं ऑस्ट्रेलियन डॉक्टरशी गुपचुप केला साखरपुडा !

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

एवलीन शर्माने सोशल मीडियावर एक मोठी बातमी देत सर्वांना सुखद धक्का दिला आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. मात्र त्यामधला एक सिनेमा सुपरहिट ठरला तो म्हणजे 'ये जवानी है दिवानी'. या चित्रपटाला चाहत्यांनी भरपूर पसंती दिली. या चित्रपटामधील एक पात्र 'लारा' म्हणजे एवलीन शर्मा होय. 'लारा' या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली.एवलीन शर्माला आजही लोकं 'लारा' या नावानेच ओळखतात. 'नौटंकी साला' आणि 'साहो' या चित्रपटांतूनही ती झळकली. एवलीन शर्माने सोशल मीडियावर एक मोठी बातमी देत सर्वांना सुखद धक्का दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Yessss!!! 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

एवलीनचा बॉयफ्रेंडशी साखरपुडा झाल्याची खुशखबर तिने इन्स्टाग्रामवर दिली. अतिशय सुंदर दिसणाऱ्या एवलीनने अनेकांचा हार्टब्रेक केला आहे. अखेर एवलीनला तिचा जीवनसाथी मिळाला आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बर ब्रिजवर प्रियकर तुषार भिंडीने एवलीनला अदगी रोमॅंण्टिक अंदाजात घुडग्यावर बसून प्रपोज केलं. एक गिटारिस्ट एवलीनचं आवडीचं गाणं वाजवत होता. प्रपोज केल्यानंतर होकार दिल्यावर किस करतानाचा रोमॅंण्टिक फोटो एवलिनने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना एवलीनने फक्त 'येस' असं लिहिलं आहे. 
एवलीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी आणि साखरपुड्याविषयी खुलासा केला. एवलीन आणि तुषान गेल्या एक वर्षापासून डेट करत आहेत. तुषान ऑस्ट्रेलियामध्ये डेंटल सर्जन आणि बिझनेसमनही आहे.

लग्नानंतर एवलीन जाणार ऑस्ट्रेलियेला...
मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार एवलीन आणि तुषान मागच्या वर्षी ब्लाईंड डेटवर भेटले होते. त्यानंतर ते खूप चांगले मित्र झाले. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र लग्नाची तारीख अजूनही ठरली नसल्याचं तिने सांगितलं. लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियामध्येच राहणार आहे. पण एक घर भारतातही असेल असं एवलीन म्हणाली. सिडनी तिचं आवडतं शहर आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #flowerchild

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

एवलीन जर्मन इंडियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 'सिडनी विथ लव्ह' या चित्रपटासह 2012 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीमध्ये येणयाआधी तिनं युकेमध्ये शिक्षम पूर्ण केलं. ती अभिनेत्रीसह उत्तम डान्सरही आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This actress from Saaho movie got engaged with boyfriend secretly