esakal | पांढरे केस लपवत का नाही? वडिलांच्या प्रश्नाला समीराने दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

पांढरे केस लपवत का नाही? वडिलांच्या प्रश्नाला समीराने दिलं उत्तर

पांढरे केस लपवत का नाही? वडिलांच्या प्रश्नाला समीराने दिलं उत्तर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - समीरा (Sameera Reddy) पहिल्यांदा टॉलीवूडमध्ये (tollywood) चमकली. त्यानंतर ती बॉलीवूडमध्ये आली. बॉलीवूडमध्ये सलमानचा भाऊ सोहेल खानसोबत (sohail khan) मैनें दिल तुझको दियामध्ये ती झळकली. आणि प्रेक्षकांची दाद तिला मिळाली. मात्र त्यानंतर तिनं काही निवडक चित्रपट केले. या चित्रपटामुळे तिची खास ओळख प्रस्थापित झाली नाही. यानंतर ती काही वेळ रियॅलिटी शो मध्येही सहभागी झाली होती. आता ती तिच्या परिवारासमवेत एक युट्युब चॅनेल चालवते. ज्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय समीरा एक फिटनेस फ्रिक देखील आहे. तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओंना मिळणारा प्रतिसादही लाखोंच्या घरात आहे. आता ती चर्चेत आली आहे ते तिच्या एका फोटोमुळे.

गेल्या काही काळापासून अभिनेत्री समीरा रेड्डी ही तिच्या बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी काम करताना दिसत आहे. त्यावेळी समीरानं आपल्या पांढऱ्या केसांमधील लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी तिला यावरुन वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत. यावर समीराला तिच्या वडिलांनी देखील एक प्रश्न विचारला होता. त्याला समीरानं मार्मिक उत्तर दिलं आहे. बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन समीरा आली होती. मात्र तिचं कारकीर्द लवकर संपली. तिनं अनेक मोठमोठ्या सेलिब्रेंटीसोबत काम केले होते. लग्न झाल्यानंतर समीराचा ट्रक बदलेला होता. मात्र तिचं बॉडी पॉझिटीव्हीटीवर काम सुरु केलं आहे.

समीराचा व्हाईट हेअर फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन तिच्या वडिलांना काळजी सतावत आहे. त्यांनी तिला एक प्रश्न विचारला आहे त्यात ते तिला सुचवतात की, तु पांढऱ्या रंगाची केसं लपवत का नाही, त्यावर समीरानं (Sameera Reddy) तिला उत्तर दिलं आहे. समीरानं आपल्या उत्तरामध्ये म्हटलं आहे की, माझ्या वडिलांनी मला विचारलं की, मी माझी पांढरी केसं का लपवत नाही, त्यांना असे वाटते की, लोकं मला त्यावरुन जज करतील. मी त्यावर त्यांना उत्तर दिलं आहे, मला काहीही फरक पडत नाही, जेव्हा लोकं माझ्याबद्दल बोलतात. काय होईल, लोकं मला म्हातारी समजती, कमी सुंदर आणि आकर्षक समजतील मला एक सांगायचं आहे की, मी काही वैतागलेली नाही. आता खऱ्या अर्थानं स्वतंत्र होण्याची वेळ आली आहे. अशा शब्दांत समीरानं उत्तर दिलं आहे.

loading image
go to top