Shivani Baokar: शिवानी बावकरचा 'लवंगी मिरची' झटका, नवी मालिका लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivani Baokar: शिवानी बावकरचा 'लवंगी मिरची' झटका, नवी मालिका लवकरच

Shivani Baokar: शिवानी बावकरचा 'लवंगी मिरची' झटका, नवी मालिका लवकरच

'लागीर झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. शिवानीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. शिवानी आता मालिका जरी करत नसली तरी तिच्या विविध पोस्ट्स मधून ती कायम चर्चेत असते. शिवानीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. शिवानी लवकरच झी मराठीवरील आगामी मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव 'लवंगी मिरची'.

(actress shivani baokar new serial coming soon in zee marathi)

हेही वाचा: Adipurush: आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते घाबरले? प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली!

रुची फिल्म्स या मालिकेची निर्मिती करत असून या मालिकेचा मुहूर्त झालाय. मालिकेत शिवानीची जोडी अभिनेता तन्मय जक्का सोबत दिसणार आहे. तन्मयची हि पहिलीच मालिका असल्याचं समजतंय. तन्मयने याआधी काही म्युझीक व्हिडिओ मध्ये अभिनय केलाय. शिवानी आणि तन्मयची हटके जोडी पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

शिवानीने याआधी लागीर झालं जी मालिकेत शितलीची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील तिचा अनोख्या गावरान अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. या मालिकेनंतर शिवानीने काही म्युझिक व्हिडीओमध्ये अभिनय केला.नंतर शिवनीने 'अलटी पलटी' आणि 'कुसुम' या मालिकांमध्ये अभिनय केलाय.

हेही वाचा: Bigg Boss 16: दोस्ती! अब्दू बिग बॉसच्या बाहेर..शिवला अश्रू अनावर

लवंगी मिरची मालिकेत शिवानी नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. झी मराठीवर सूरु होणाऱ्या या मालिकेचा स्लॉट अजून ठरला नाहीये. या मालिकेमुळे झी मराठीवरील कोणती मालिका बंद होणार याची माहिती सुद्धा काहीच दिवसांमध्ये स्पष्ट होईल.