Ruchismita Guru: इंडस्ट्री पुन्हा हादरली! अभिनेत्रीचा नातेवाईकाच्या घरी संशयास्पद मृत्यू..

Ruchismita Guru
Ruchismita GuruEsakal

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचं निधन झालं त्यातच आता मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी येत आहे. उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

रुचिस्मिता २६ मार्च २०२३ रात्री तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच बलांगीर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला.

Ruchismita Guru
Deepika Padukone Trolled: एवढ्या उकाड्यात इतकं जाड जॅकेट अन् रात्री काळा चष्मा ही कोणती फॅशन! दीपिका झाली ट्रोल

रुचिस्मिता गुरु ही मूळची बालंगीर शहरातील तळपलीपाडा येथील रहिवासी होती. ती सुदापाडा येथे मामाच्या घरी राहात होती. रुचिस्मिता गुरूने अनेक अल्बममध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच ती गायनाच्या जगातही सक्रिय होती. रुचिस्मिता गुरूने अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केले होते.

दरम्यान, याप्रकरणी रुचिस्मिताच्या घरच्यांशी पोलिसांनी संवाद साधला असता तिच्या आईने सांगितले की, बटाट्याचा पराठा बनवण्यावरून तिचा मुलीसोबत वाद झाला.

Ruchismita Guru
Priyanka Chopra: देसी गर्लनं पुन्हा केली कमाल! बनली 'अकादमी ऑफ मोशन पिक्चर'ची सदस्य

रुचिस्मिताच्या आईच्या म्हणण्यानुसार त्यांनी तिला रात्री आठ वाजता बटाट्याचा पराठा बनवायला सांगितला, पण तिने रात्री दहा वाजता बनवणार असल्याचे सांगितलं. यावरून आमच्यात भांडण झालं.

धक्कादायक म्हणजे अभिनेत्रीने यापूर्वीही अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारणाचा शोध घेत आहेत.. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. त्यावरुन या मृत्यूचं कारण समोर येण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com