esakal | 'क्योंकि बहू भी कभी टेनिस फॅन थी' स्मृती इराणी यांचा व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

smriti irani

'क्योंकि बहू भी कभी टेनिस फॅन थी' स्मृती इराणी यांचा व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केंद्रीय मंत्री आणि एकेकाळी टीव्ही स्टार असणा-या स्मृती इराणी (smriti irani) यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांची क्योंकी सास भी कभी बहू थी (kyoki sans bhi kabhi bahu di) ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली होती. त्यात त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली होती. तुलसी या सुनेची भूमिका त्यांनी केली होती. त्यातील संवाद, पात्रं अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपलं टेनिस प्रेम व्यक्त केलंय. (actress smriti irani share old video of steffi graf getting a marriage proposal with a funny caption goes viral)

केंद्रीय मंत्री आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेत्री स्मृती इराणी सर्वांना माहिती आहेत. ते त्यांच्या परखड स्वभावासाठीही सर्वज्ञात आहेत. त्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आता त्यांनी सोशल मीडियावर एक गंमतीशीर मीम्स शेअर केले आहेत. स्मृती यांनी टेनिस खेळाविषयीचे एक गंमतीशीर मीम्स व्हायरल केले आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. आपण टेनिस खेळाचे फॅन्स आहोत. असे त्यांनी सांगितले आहे. स्मृती यांनी इंस्टावर स्टेफी ग्राफचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा: त्यानंतर ते पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत...'हम दिल चूके' ची 22 वर्षे

या व्हिड़िओमध्ये आपल्याला पाहायला मिळते, स्टेफी कोर्टवर खेळत आहे. त्यावेळी तिला प्रेक्षकांमधून एक जण माझ्याशी लग्न करशील का, असा प्रश्न विचारतो. त्यावर ती त्याला तुझ्याकडे किती पैसे आहेत, असा उलट प्रश्न करते. त्यानंतर स्टेफी थोडीशी लाजते. प्रेक्षकांनाही हसु आवरत नाही. या व्हिडिओमध्ये स्टेफीच्या सेन्स ऑफ ह्युमरची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसतेय..

loading image
go to top