श्रीदेवी यांची ऑनस्क्रिन बहीण अभिनेत्री सुजाता कुमार काळाच्या पडद्याआड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अभिनेत्री सुजाता कुमार यांना मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता. मुंबईत लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहोचल्याने त्यांच्या शरिरातील काही अवयवही निकामी झाले होते. 

मुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही काळपासून सुजाता या कॅन्सरशी लढत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची बहीण आणि अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. 
 

सुजाता यांना मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता. मुंबईत लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहोचल्याने त्यांच्या शरिरातील काही अवयवही निकामी झाले होते. 
 

 

'इंग्लिश विंग्लिश' सिनेमातील सुजाता यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले होते. शिवाय त्यांनी 'रांझणा', 'सलाम-ए-इश्क', 'गोरी तेरे प्यार मे' या सिनेमांत काम केले आहे. 'हॉटेल किंग्स्टन', ' बॉम्बे टॉकिंग', अनिल कपूर स्टारर '24' या टिव्ही शोजमध्येही सुजाता यांच्या भुमिका होत्या.  
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Sujata Kumar Passes Away