
विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, माझे नाव सर नाही. तर राहुल म्हणूनच मला हाक मारा.
मुंबई - कॉग्रेसचे माजी अध्यक्ष हे बुधवारी पाँडेचेरीच्या दौ-यावर होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिथे एप्रिलमध्ये निवडणूका होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी राहुल तिथे गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पक्षाच्या प्रचारासाठी ते तिथे गेले होते.ज्यावेळी राहुल तिथे विद्यार्थ्यांना संबोधित करत होते तेव्हा सर म्हणून त्यांनी हाक मारली. त्यानंतर राहूल यांनी गंमतीशीरपणे उत्तर दिले.
विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, माझे नाव सर नाही. तर राहुल म्हणूनच मला हाक मारा. सर तुम्ही तुमच्या प्राचार्य आणि शिक्षकांना म्हणा. मला मात्र राहूलच म्हणा. असे म्हटल्यानंतर विद्यार्थी आनंदित झाले. त्यांना राहूलचे उत्तर फार आवडले. ते म्हणाले आम्ही तुम्हाला राहुल अण्णा असे म्हणूनच हाका मारु. त्यावर राहूलनंही संमती दर्शवली. पाँडेचेरीमध्ये येत्या एप्रिलमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहे. त्यात कॉग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षाच्या चार आमदरांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राहूल गांधी यांना पुन्हा पक्षबांधणी करण्याचे मोठे आव्हान आहे.
Sweet ! :) https://t.co/jsIzxao96R
— Swara Bhasker (@ReallySwara) February 17, 2021
राहूल गांधी यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावर अभिनेत्री स्वरा भास्करनं लिहिलं आहे स्वीट. स्वराच्या य़ा व्टिटवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी तिला त्यावरुन छेडलेही आहे. खरं तर राहुल यांनी यापूर्वीही काही शाळा आणि कॉलेजमध्ये भाषणाच्य़ा वेळी विद्यार्थ्यांना मला सर म्हणू नका असे सांगितले होते. आपल्याला कोणी सर म्हणावे असे त्यांना आवडत नाही. असाच एक किस्सा चेन्नईतील स्टेला मेरिट कॉलेजमध्ये घडला होता.