esakal | बाई, बघा आता, पॅरिसमध्ये बंगला, घरात पाच कोटींची कॅश

बोलून बातमी शोधा

actress taapsee pannu paris house five core rupees cash found income tax department}

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर अभिनेत्री तापसी पन्नूने पहिल्यांदाच ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

manoranjan
बाई, बघा आता, पॅरिसमध्ये बंगला, घरात पाच कोटींची कॅश
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई : तापसीसाठी आयकर विभाग मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. आता तिच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरील प्रॉपर्टीवर छापे मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नवनवीन गोष्टीं समोर येत आहे. तापसीबरोबरच बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याही नावाचा समावेश आहे. तापसीची फॉरेन कंट्रीत असलेली गुंतवणूकही यावेळी आयकर विभागानं लक्षात घेतली आहे. दुसरीकडे तापसीनं आपल्याविरोधात कशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तापसीची चक्क पॅरिसमध्ये संपत्ती अशी नवी माहिती समोर आली आहे.

त्याचं झालं असं की, दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने 3 मार्च रोजी छापा टाकला होता. त्यावरुन मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली होती. तापसी, अनुराग आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून फॅंटम फिल्म्सची सुरुवात केली होती. मात्र सध्या फॅंटम कंपनी बंद आहे. मुंबई आणि पुण्यातील 30 ठिकाणी आयकर विभागाद्वारे छापेमारी करण्यात आली. यानंतर तापसीनं पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. तिनं त्यात आपल्यावर करण्यात आलेली कारवाई याचे पध्दतशीर नियोजन करण्यात आल्याचे सुचित केले आहे.

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर अभिनेत्री तापसी पन्नूने पहिल्यांदाच ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''3 दिवसांच्य़ा आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या शोधात प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश करण्य़ात येतो. 1 पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला बंगला कारण की, उन्हाळ्याच्या आत्ता सुट्ट्या सुरु होणार आहेत. 2 मी याआधीच नाकारलेल्या 5 कोटी रुपयाची कथित पावती. 3 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिलेल्या वृत्तानुसार 2013 मध्ये माझ्यावर टाकलेल्या आयकर विभागाच्या छाप्याची आठवण.''

तापसीनं केलेल्या या व्टिटवर अभिनेत्री कंगणानंही उत्तर दिलं आहे. तिनं तापसीवर टीका करताना तु पहिल्यापासून स्वस्तच असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, आता आयकर विभागाने केलेली कारवाई आहे त्याच व्य़क्तींवर 2013 मध्ये छापे टाकण्यात आले होते. मात्र त्यावेळेस या गोष्टीची कोणत्याही प्रकारे चर्चा झाली नव्हती. सध्य़ाच्या परिस्थीमध्ये आयकर विभागाद्वारे केलेल्या कारवाईची चर्चा मोठा विषय़ बनली आहे.

देशातील राजकीय नेत्यांनी, बॉलिवूड सेलेब्रिटींनी, राहुल गांधी आणि शिवसेनेने सुध्दा य़ा छाप्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. तसेच भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा प्रियकर मॅथियस बोई याने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजूजू यांना ट्विट केलं होतं. ''घरामध्ये तणाव निर्माण झाला आहे'' असं म्हटलं होतं. मात्र रिजूजू यांनी उत्तर देताना म्हटले की, ''कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे.''