'सात मिनिटांत बदलून गेलं तिचं आयुष्य'; 'बेबी'ची सहा वर्षे

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

तापसी सध्याच्या घडीला प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिचे जे चित्रपट आले ते यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. बेबी चित्रपटात तिला भूमिका मिळाली होती.

मुंबई - आवडीची भूमिका मिळणे, त्यात जीव ओतून काम केल्यावर त्याचे चीज होणे ते त्याचा आनंद अनुभवता येणं हा नशीबाचा भाग म्हणावा लागेल. प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला असा योग येईल हे काही ठोसपणे सांगता येणार नाही. बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना त्यांच्या आवडीची भूमिका मिळाली त्यामुळे त्यांना ओळखले जाऊ लागले. बेबी या चित्रपटाला नुकतीच सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं अभिनेत्री तापसी पन्नुने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे.

तापसी सध्याच्या घडीला प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिचे जे चित्रपट आले ते यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. बेबी चित्रपटात तिला भूमिका मिळाली होती. मात्र ती कशी मिळाली आणि तिनं कशाप्रकारे त्या भूमिकेला न्याय दिला याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. बेबी चित्रपटाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात जेव्हा रोलसाठी विचारणा झाली तेव्हा आपल्यासाठी 7 मिनिटे फार महत्वाची होती. असे तिनं सांगितले आहे. अक्षयनंही तिच्या त्या भूमिकेचे कौतूक केले होते. तापसी तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिनं त्या भूमिकांना न्याय देण्याचे काम केले आहे.

बेबीतील तिच्या भूमिकेचे सगळ्यांनी कौतूक केले होते. नाम शबानामध्येही ती दिसली होती. एका गुप्तहेराची भूमिका तिनं साकारली होती. त्या चित्रपटाला नुकतीच सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. अक्षय़नंही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तापसीचं कौतूक केलं आहे. त्यानं तापसीच्या करिअरविषयी आपल्याला गर्व वाटत असल्याचे म्हटले आहे. त्या चित्रपटात तापसीच्या वाट्याला आलेली भूमिका केवळ सात मिनिटांची होती. त्यात तिनं कमाल केली. अभिनयानं सर्वांना जिंकून घेतले. हे सगळ्यात महत्वाचे आहे असे वाटते. त्यानंतर तिच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. तापसीनं म्हटले होते, मिनिटांच्या भूमिकेनं काही बिघडत नाही. मला त्यावेळी केवळ 7 मिनिटे मिळाली. आपकी नाम शबाना असे तिनं म्हटले आहे.

 तापसीच्या व्टिटला अक्षयनं उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, तुझ्याजवळ जे आहे त्याचा तु स्वतच्या विकासासाठी फायदा घ्य़ायला हवा. तु यापुढेही जे काही करशील त्यावर मला गर्व असेल असे अक्षयनं सांगितले आहे. 2015 मध्ये आजच्या दिवशी नीरज पांडे दिग्दर्शित बेबी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात राणा दुग्गावती, डॅनी डेन्जोप्पा, अनुपम खेर आणि तापसी पन्नु यांच्या भूमिका होत्या. शबाना नावाची व्यक्तिरेखा तापसीनं या चित्रपटात साकारली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress taapsee pannu as Shabana in baby movie share poste on six year of baby