esakal | मीराबाई चानूला शुभेच्छा देताना टिस्का चोप्राकडून चूक, मागितली माफी
sakal

बोलून बातमी शोधा

actress tisca chopra apologises for congratulating mirabai chanu with indonesian weightlifter photo pvk99

मीराबाई चानूला शुभेच्छा देताना टिस्का चोप्राकडून चूक, मागितली माफी

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावलं. 49 किलो वजनी गटात तिने ही कामगिरी केली. तिच्या या कामगिरीचे कौतुक करत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. बॉलिवूडमधील तापसी पन्नू, फरहान अख्तर, सोफी चौधरी, सनी देओल, अक्षय कुमार, लारा दत्ता, सुनिल शेट्टी, अनिल कपूर आणि अभिषेक बच्चन या कलाकारांनी मीराबाईला सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्री टिस्का चोप्राने देखील ट्विट केलं होतं. मात्र ट्विटसोबत टिस्काने मीराबाईचा फोटो शेअर करण्याऐवजी इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आइसा विंडी कैंटिकाचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. चूक लक्षात आल्यानंतर आता टिस्काने नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.

टिस्काने ट्विट करत माफी मागितली

टिस्काने मीराबाई यांचा चुकीचा फोटो पोस्ट केल्याबद्दल माफी मागण्यासाठी ट्विट केले, 'तुम्ही माझ्या या चुकीची मजा घेतली, पण मी मनापासून माफी मागते. माझ्याकडून नकळत ही चूक झाली. याचा अर्थ असा नाही की मी मीराबाई यांचा आदर करत नाही.'

नेटकऱ्यांनी कमेंट करत दाखवली होती चूक

टिस्काने मीराबाई ऐवजी दुसऱ्या वेटलिफ्टर फोटो पोस्ट केल्याने तिला अनेकांनी कमेंट करून टिस्काला तिची चूक सांगतिली होती. नेटकऱ्याने कमेंट केली, 'या मीराबाई नाहित. या इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आहेत ज्यांनी कांस्य पदक जिंकले'. तर दुसऱ्याने कमेंट केली 'या मीराबाई नाहित कृपया आपलं ज्ञान वाढवावे'

हेही वाचा: निर्मिती ते वनिता; 'Size Zero' ट्रेंड मोडणाऱ्या अभिनेत्री

टिस्काने तारे जमिन पर, दिल तो बच्चा है जी, लव ब्रेक अप जिंदगी आणि अंकूर अरोरा मर्डर केस यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. टिस्काने चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. कहानी घर घर की , अस्तित्व एक प्रेम कहानी आणि 24 या मालिकेतील टिस्काच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

हेही वाचा: अभिनेत्री 'बाईंना' मीराबाई चानू माहित नाही; मग ट्रोल तर होणारच!

loading image
go to top