Marathi Serial: संकेत मिळताच नेत्राच्या कानामागून कसा येतो घाम? तितिक्षानं सांगितली मॅजिक ट्रिक

अभिनेत्री तितिक्षा तावडेने सांगितले 'सातव्या मुलीची सातवी गोष्ट' मालिकेतील पडद्यामागे घडणारे खास किस्से..
actress titeeksha tawde shared  behind the scene of Satvya Mulichi Satavi Mulagi serial in sakal podcast
actress titeeksha tawde shared behind the scene of Satvya Mulichi Satavi Mulagi serial in sakal podcastsakal

teetiksha tawde: 'सरस्वती' या आपल्या पहिल्या मालिकेपासून ते आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमधून कायम सोज्वळ,साध्याभोळ्या भूमिकेत दिसणारी तितिक्षा सध्या आपल्याला छोट्या पडद्यावरच्या 'सुपर वुमन'च्या भूमिकेत दिसत आहे. अर्थात सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्रा ही तिची व्यक्तिरेखा अगदीच वेगळ्या धाटणीची आहे. ती साधीभोळी असली तरी तिच्याकडे एक दैवी शक्ती आहे ज्याचा ती गरजू लोकांसाठी वापर करताना दिसत आहे. याच भूमिकेतील काही खास किस्से आणि पडद्यामागच्या गोष्टी तितिक्षाने 'सकाळ unplugged' या पॉडकास्टमध्ये सांगितल्या आहेत.

(actress titeeksha tawde shared behind the scene of Satvya Mulichi Satavi Mulagi serial in sakal podcast)

actress titeeksha tawde shared  behind the scene of Satvya Mulichi Satavi Mulagi serial in sakal podcast
Prajakta Mali: आहे तर दाखवायलाच हवं.. हे काय बोलून गेली प्राजक्ता माळी..

मालिकेत तितिक्षाला देवीचे वरदान आहे. ती अपशकुणी आहे, असा गावाचा संकेत असला तरी तिला मात्र जे घडणार आहे तेच आधी दिसतं. त्यामुळे एखाद्याने भविष्य ती सहज जानू शकते. पण समोरच्याच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे ही तिला कळताना, तीला संकेत मिळताना तिला प्रचंड वेदना होतात, असे दाखवण्यात आले आहे.

ही संकेत मिळताना ती हाताची बोटं एका विशिष्ट पद्धतीने डोक्यावर ठेवते. तिचं अंग थरथरतं, ती कोसळू लागते आणि तिच्या कानामागून पाण्याचा म्हणजेच घामाचा ओघळ येतो. पण ही सगळं कसं होतं, प्रत्येकवेळी ती ही कसं जमवते याविषयी मालिकेतील पडद्यामागे काय घडतं याचा अनुभव तिने 'सकाळ डिजीटल' सोबत शेअर केला आहेत.

हे सगळं होत असताना प्रेक्षक अवाक होऊन पाहत असतात.प्रेक्षकांना प्रश्न पडतो ही नेमकं कसं होतं. तितिक्षा नेमकं कसा अभिनय करते, त्यावेळी तिला तो भाव आणण्यासाठी काय करावं लागतं. तर यामगे एक दिग्दर्शकाची मॅजिकल ट्रिक आहे. ती ट्रिक वापरुन हा सर्व सीन जुळवला जातो. अत्यंत भन्नाट अशी युक्ती यासाठी वापरली जाते. त्यावेळी नेमकं काय घडतं ही जाणून घ्यायच असेल तर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि 'सकाळ पॉडकास्ट' ऐका. यामध्ये तितिक्षाणे तिच्या आयुष्यातील काही आध्यात्मिक अनुभवही सांगितले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com