Tunisha Sharma : 'जो जुनून के दम पर आगे बढ़ते हैं...' आत्महत्येच्या काही तास आधी केली होती पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma : 'जो जुनून के दम पर आगे बढ़ते हैं...' आत्महत्येच्या काही तास आधी केली होती पोस्ट

Tunisha Sharma : 'जो जुनून के दम पर आगे बढ़ते हैं...' आत्महत्येच्या काही तास आधी केली होती पोस्ट

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टूनिशा शर्माने मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सब टीव्हीच्या अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये राजकुमारी मरियमची भूमिका साकारणारी तुनिषा शर्मा टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सेटवर काहीशी उदास दिसत होती असे सांगितले जात आहे.

तुनिषा शर्माने आत्महत्येच्या 5 तास आधी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने लिहिले होते, "जो अपने जुनून से प्रेरित होते हैं, रुकते नहीं हैं. तुनिषा सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती अनेकदा तिचे स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसत होती. टीव्ही मालिकांसोबतच तिने चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू चालवली होती.

हेही वाचा: LIVE Update: टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माची सेटवरच आत्महत्या

तुनिषा फक्त 20 वर्षांची होती. त्यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' या मालिकेतून तिने पदार्पण केले. सध्या तरी तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तुनिषाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भिवडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा: Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची सेटवरच आत्महत्या

टॅग्स :actress