
मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे काही काळ लाईमलाईटमध्ये होते. त्यानंतर मात्र त्यांची लोकप्रियता कमी झाली. तसेही त्यांना त्यांच्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त ओळख मिळत होती. अभिनेत्री व्टिंकल खन्नाच्या बाबतीत असेच काही म्हणता येईल. ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावर फार चमक दाखवू शकली नाही. तिच्या बरोबर जे अभिनेते होते त्यामुळे तिला जास्त ग्लॅमर मिळाले. व्टिंकल खन्नानं सलमान खान, अजय देवगण, बॉबी देओल, आमीर खान, अक्षय कुमार, यासारख्या अभिनेत्यांबरोबर तिनं काम केले आहे. व्टिंकल सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणा-या व्टिंकलला त्यामुळे ट्रोल व्हावे लागले आहे.
व्टिंकल खन्ना ज्यावेळी अक्षय कुमारची पत्नी झाली तेव्हा तिनं आपला बराचसा वेळ गृहिणी म्हणून व्यतीत करण्यास सुरुवात केल्याचे दिसुन आले. व्टिंकल एक चांगली लेखिकाही आहे. नुकतंच तिचं एक पुस्तकही प्रदर्शित झालं आहे. चित्रपटांपासुन लांब असणारी व्टिंकल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असल्याचे दिसून आले आहे. कधी तिच्या वेगळ्या लूकची चर्चा असते. तर कधी ती तिच्या व्टिटमुळे ट्रोलही झाली आहे. आताही तिनं एक व्टिट केलं त्यामुळे ती चर्चेचा विषय झाली आहे.
व्टिंकलनं एक व्टिट केलं आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, कसं कळलं असतं की आपण एक भयंकर आई आहोत ते. व्टिंकलचं हे व्टिट जोरदारपणे व्हायरल झाले आहे. तिला काही महिलांच्या कमेंटही आल्या आहेत. त्यांनी तिच्या त्या व्टिटला ट्रोल केले आहे. एकीनं लिहिलं आहे की, कुठलीही आई ही कधी परफेक्ट नसते. सध्याच्या काळात परफ्केशन हा केवळ भ्रम म्हणून समोर येत आहे. अशाप्रकारे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत.
व्टिंकल ही आरव आणि नितारा या दोन मुलांची आई आहे. ती सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं नितारा बरोबल एक फोटो शेअर केला होता. त्यात त्या दोघीजणी पुस्तक वाचताना दिसत आहेत. व्टिंकलनं 1995 मध्ये बरसात चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.