
अभिनेत्री वीणा जगताप पुन्हा मालिका विश्वात, या मालिकेत घेणार एंट्री..
veena jagtap : 'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' यासारख्या दर्जेदार मालिकांमधून प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री वीणा जगतापचा चाहता वर्ग मोठा आहे. वीणा 'बिगबॉस' मध्येही सामील झाली होती. पण बऱ्याच दिवसात वीणा कोणत्या मालिकेत झळकली नाही. कधी एकदा ती मालिका विश्वात येते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण जवळ आला आहे. (actress veena jagtap come back in star pravah thipkyanchi rangoli serial)
हेही वाचा: 'सत्ता बळकावणाऱ्याला..' उद्धव ठाकरेंविषयी किरण मानेचं खळबळजनक विधान..
स्टार प्रवाह (star pravah)वरील 'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी. प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप अवंतिकाची भूमिका साकारत असून हे पात्र साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे.
स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका. मात्र पहिल्याच दिवशी सेटवर तिची सर्वांसोबतच छान मैत्री झालीय. कानेटकर कुटुंबाची मी चाहती होतेच; या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशी भावना वीणाने व्यक्त केली. अवंतिका या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना ती म्हणाली, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे. उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी. अवंतिका हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी मिळतं जुळतं आहे असं मला वाटतं. जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळी होणारी अशी अवंतिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.
Web Title: Actress Veena Jagtap Come Back In Star Pravah Thipkyanchi Rangoli Serial
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..