
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितले होते की, अभिनेत्री होण्याचं माझं कुठलही स्वप्न नव्हतं.
मुंबई - अभिनेत्री जरीन खान जेव्हा बॉलीवूडमध्ये आली होती तेव्हा तिला लोकांनी कॅटरीनाची डुप्लिकेट म्हणून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. अजूनही तिच्यावर टीका होत असते. जरीन खानने सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत वीर या चित्रपटात काम केले होते. ज्यावेळी प्रेक्षकांनी तिला पाहिलं तेव्हा त्यांनी जरीन खानची तुलना कॅटरीनाशी केली होती. मात्र तिची भूमिका प्रेक्षकांना आवडलीही होती. आता जरीन खाननं आता पुन्हा बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्तानं तिनं तिच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.
प्रेक्षकांनी आपल्याला वेगवेगळी नावं दिली होती असे जरीन खाननं सांगितले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितले होते की, अभिनेत्री होण्याचं माझं कुठलही स्वप्न नव्हतं. मी स्वताला कधीही चित्रपटात पाहिले नव्हते. मात्र जेव्हा मी बॉलीवूडमध्ये येण्याचे ठरवले तेव्हापासून माझ्या संघर्षाला सुरुवात झाली. माझ्या रस्त्यात अनेक अडथळे आले. काही वेगळ्या प्रकारच्या भूमिकाही मला कराव्या लागल्या.
नकारात्मक भूमिका स्वीकाराव्या लागल्या. कारण तो त्या चित्रपटाशी संबंधित विषय होता. आता बराच वेळ झाला आहे आणि मला काम मिळालेले नाही. त्यामुळे मी पुन्हा कामाच्या शोधात आहे. मला काही कुठल्या मालिकेत काम कऱण्याची इच्छा नाही. ज्यांच्यासोबत काम करायचे नाही अनेकदा नाइलाजानं ते काम मला करावे लागत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीस आपण पात्र ठरत नसल्याची कल्पना असल्याचेही जरीनानं यावेळी सांगितले. ती म्हणाली, हे एक धोकादायक सर्कल आहे. ज्यात प्रत्येकजण तुमच्यातील टॅलेटला दाखवत नाही. एकाचप्रकारचे रोल घेऊन मी फसले. ते त्यावेळी मला समजले नाही.