Adarsh Shinde: मुंबई पोलीस बँड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. आदर्शने शेयर केला खास व्हिडीओ..

आदर्शच्या पोस्टनं वेधलं लक्ष..
Adarsh Shinde shared video of mumbai police band on dr babasaheb ambedkar jayanti
Adarsh Shinde shared video of mumbai police band on dr babasaheb ambedkar jayanti sakal
Updated on

Adarsh shinde : शिंदेशाहीतील एक दमदार आवाज म्हणजे उत्कर्ष शिंदे. ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा वारसा आदर्श समर्थपणे पेलत आहे. आज मराठीत आदर्शचा आवाज हा सर्वाधिक लोकप्रिय आवाज ठरला आहे.

आजवर आदर्शने शेकडो गाणी गायली. त्याचा आवाज असा कि आपल्याला नाचायला भाग पाडतो. आदर्श सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्यामुळे त्यांच्या पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असते.

काल डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्याने एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये मुंबई पोलिस बॅन्ड एक खास गाणे वाजवताना दिसत आहेत. या गाण्याचे आणि आदर्शचे एक खास कनेक्शन आहे, हे आदर्शने पोस्ट मधून सांगितले आहे.

(Adarsh Shinde shared video of mumbai police band on dr babasaheb ambedkar jayanti )

Adarsh Shinde shared video of mumbai police band on dr babasaheb ambedkar jayanti
Marathi Serial: आईसोबत दीपालाही केलं धोबीपछाड.. TRP वर फक्त जुई गडकरीची हवा..

काल आंबेडकर जयंती निमित्त मुंबई पोलिसांनी बाबासाहेब आंबडेकर यांना मानवंदना दिली. अत्यंत सुश्राव्य वाद्याच्या तालात मुंबई पोलिसांनी ब्रास बॅन्ड वाजवला. हा व्हिडिओ आदर्शने शेयर केला आहे. सोबत एक कॅप्शनही दिले आहे.

''मुंबई पोलीस बँडची भारतरत्न “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांना आपल्या सर्वांचे लाडके गायक “आनंद शिंदे” यांचं बाबासाहेबांचं पहिलं रेकॉर्डेड “सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीम बाळ” हे गाणं वाजवून सुरेल मानवंदना.. तुम्हा सर्वांसोबत शेयर करतोय नक्की ऐका.''असे आदर्शने म्हंटले आहे.

या गाण्याचे आणि आदर्शच्या वडिलांचे म्हणजे गायक आनंद शिंदे यांचे असलेले खास नाते आदर्शने या पोस्ट मधून सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com