Adipursh: 'रावणाच्या कपाळावर गंध का नाही'? हिंदू महासभा भडकली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

adipurush movie news

Adipursh: 'रावणाच्या कपाळावर गंध का नाही'? हिंदू महासभा भडकली!

Adipursh: प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषचा टीझर व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर वेगळ्याचा वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राऊत यांच्या आदिपुरुषची चर्चा होती. अखेर त्याचा टीझर समोर आला आहे. मात्र त्याला नेटकऱ्यांच्या मोठ्या वादाचा सामना करावा लागत आहे. रुढार्थान रामायणावर भाष्य न करता त्यावर वेगळ्या अर्थानं भाष्य करणारा चित्रपट म्हणून आदिपुरुषकडे पाहिले जात आहे. आता त्यावर हिंहू महासभेनं नाराजी व्यक्त केली आहे.

बाहुबलीमधून आपल्या नावाची वेगळी छाप उमटविणाऱ्या प्रभासची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यानं आदिपुरुषमध्ये रामाची भूमिका केली आहे. तर सैफ अली खाननं रावणाची भूमिका पार पाडली आहे. सैफ अली खाननं ही भूमिका करणे हेच नेटकऱ्यांना खटकणारे कारण होते. ज्यावेळी त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता तेव्हापासून नेटकऱ्यांनी सैफला धारेवर धरले आहे. त्याचा या चित्रपटातील रावणाचा लूक समोर आल्यानंतर त्यामध्ये रावणाच्या कपाळावर गंध नसल्यानं हिंदू महासभेनं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Adipursh MOVIE

Adipursh MOVIE

अनेक नेटकऱ्यांनी आदिपुरुषमधील गोष्टींवर सडकून टीका केली आहे. त्यातील व्हीएफएक्स, ग्राफीक्स यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखिल भारत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सैफवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सैफ अली खाननं रावणाची थट्टा केली आहे. आदिपुरुषमध्ये रावणाला अशाप्रकारे पोट्रेट करण्यात आले आहे की, जसे दहशतवादी खिलजी, चंगेज खान आणि तो औरंगजेब असल्यासारखे दाखवण्यात आले आहे.

रावणाच्या कपाळावर तर टिळा देखील दिसत नाहीये. याचा अर्थ आपण काय घ्यायचा. आपल्या पौराणिक गोष्टींची जर अशाप्रकारे मोडतोड होत असेल तर मग ती आपण का सहन करायची? असा प्रश्न यावेळी महासभेच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे. याशिवाय भाजपच्या प्रवक्त्या मालविका यांनी देखील आदिपुरुषवर सडकून टीका केली आहे.