Adipurush BO Collection: डायलॉग बदलूनही श्री रामाचा शाप लागला? 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर धाडकन आपटला!

Adipurush box office collection drop on day 7 bollywood news
Adipurush box office collection drop on day 7 bollywood newsEsakal

Adipurush Box Office Collection Day 7: ओम राऊत यांचा रामायणावर आधारित 'आदिपुरुष' चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रिलीज झाल्यापासून, चित्रपटाला त्यातील संवाद आणि कलाकारांचे लूक त्याचबरोबर अनेक घटनांवर लोकांचा आक्षेप आहे.

त्यामुळे या चित्रपटाला कडाडून विरोधही होत आहे. दरम्यान प्रेक्षकांनी आता या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. रिलिजपुर्वीच हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडेल असा विश्वास निर्मात्यांना होता मात्र तसं काहीस बॉक्स ऑफिसच्या आकड्यावरुन दिसत नाही आहे.

सोमवारपासूनच 'आदिपुरुष'च्या कमाईत सातत्याने घट नोंदवली जात आहे. त्यातच आता 'आदिपुरुष'ने गुरुवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली याचे आकडेही समोर आले आहेत जे निर्मात्यांसाठी खुप निराशाजनक आहे.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' ने रिलीजच्या सातव्या दिवशी चित्रपटाने केवळ 5.50 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. जो आकाडा बुधवारच्या तुलनेत आणखीणच कमी झाला आहे. बुधवारी 'आदिपुरुष'ने 7.25 कोटींचा व्यवसाय केला. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 260.55 कोटींवर पोहोचले आहे.

Adipurush box office collection drop on day 7 bollywood news
Tanvi Thakkar - Aaditya Kapadia च्या आयुष्यात नवा पाहुणा, पेढा कि बर्फी?

राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान यांनी स्टारर 'आदिपुरुष 'ने ओपनिंग तर चांगली दिली मात्र हा वाढता आलेख ते कायम ठेवु शकले नाहीत.

500 ते 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 260.55 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Adipurush box office collection drop on day 7 bollywood news
Adipurush Nepal: नेपाळमध्ये आदिपुरुषवरील बंदी उठवली, मात्र काठमांडूचे महापौर काही ऐकेना..

वादांच्या दरम्यान, 'आदिपुरुष ' चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली. या चित्रपटावर नेपाळमध्ये काही दिवसांसाठी बंदी होती, जी आता हटवण्यात आली आहे.

 गुरुवारी नेपाळच्या न्यायालयाने आदिपुरुषसह हिंदी चित्रपटांवरील बंदी उठवली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन थांबवू नये, असेही न्यायालयाने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र, या चित्रपटाबाबत नेपाळच्या महापौरांची नाराजी अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे शिक्षा झाली तरी चालेल मात्र चित्रपट चालवू देणार नसल्याच त्यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com