Prabhas at Tirpupati: पिक्चर हिट.. सुपरस्टार प्रभास तिरुपती बालाजीच्या चरणी नतमस्तक, फॅन्सना आनंद

Adipurush: आदिपुरुष सिनेमा १६ जुनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
adipurush fame prabhas visit tirupati balaji temple before adipurush pre release event
adipurush fame prabhas visit tirupati balaji temple before adipurush pre release event SAKAL

Adipurush Prabhas Blessing of Lord Venkateswara News: आदिपुरुष सिनेमाच्या रिलीजला अवघे काहीच दिवस उरलेत. काहीच दिवसात प्रेक्षकांना रामायणाची गाथा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे, सैफ अली खान असे अनेक कलाकार आदिपुरुषमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.

जगभरातले प्रेक्षक आदिपुरुष पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच प्रभासने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय.

(adipurush fame prabhas visit tirupati balaji temple before adipurush pre release event)

adipurush fame prabhas visit tirupati balaji temple before adipurush pre release event
Akshay Bhalerao: चपाती बरोबर जात का खात नाही? अक्षय भालेराव प्रकरणावर हास्यजत्रेच्या कलाकाराची जळजळीत पोस्ट

प्रभासच्या आगामी आदिपुरुषचा रिलीजपूर्व (Pre - Release Event) कार्यक्रम मंगळवारी संध्याकाळी तिरुपतीमध्ये होणार आहे. या भव्य कार्यक्रमापूर्वी, प्रभासने मंगळवारी पहाटे भगवान बालाजीचे आशीर्वाद मागितले.

चिन्ना जेयर स्वामी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रभासच्या तिरुपती मंदिर भेटीचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत.

ट्विटरवर शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये प्रभास त्याच्या टीमसोबत कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसला. अनेक पोलीस अधिकारीही त्यांच्या जवळ उभे होते.

तिरुपती मंदिरात येताच प्रभासने त्याच्या चाहत्यांना आणि पापाराझींना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभासने पांढरा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते.

त्याला मंदिरात लाल शालही देण्यात आली होती जी त्यानेभोवती गुंडाळली होती. कार्यक्रम स्थळ सोडण्यापूर्वी अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना हसून अभिवादन केलं.

आज मंगळावर सायंकाळी आदिपुरुषचा नवीन ट्रेलर भेटीला येतोय. त्यासाठी मोठा इव्हेंट असणार आहे. त्याआधी प्रभासने तिरुपती मंदिरात जाऊन बालाजीचं दर्शन घेतलंय.

दरम्यान हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये आदिपुरुष हा चित्रपट रिलिज होणार आहे. आदिपुरुष सिनेमात प्रभु रामाच्या भूमिकेत प्रभास,

माता सीतेच्या भूमिकेतील क्रिती अन् लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग तर लंकेशपती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान तर हनुमानाच्या भुमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसत आहे.

अलीकडेच आदिपुरुषच्या कमाईशी संबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 420 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

hindi.asianetnews या न्यूज पोर्टलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे चित्रपटाचे थिएटर हक्क 2 राज्यांमध्ये 170 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

इतकच नाही तर याशिवाय या चित्रपटाची ओटीटी डीलही पूर्ण झाली असून सर्व भाषांचे हक्क नेटफ्लिक्सने 250 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. आदिपुरुष सिनेमा १६ जुनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com