Adipurush Leak Online: आधीच फ्लॉप, त्यात करोडोंचा फटका, आदिपुरुष यु ट्यूबवर लीक झाला

दुष्काळात तेरावा महिना अशी गोष्ट आदिपुरुष बद्दल घडलीय. आदिपुरुष यु ट्यूबवर लीक झालाय.
Adipurush film LEAKED on YouTube ahead of OTT release; crosses 2 million views
Adipurush film LEAKED on YouTube ahead of OTT release; crosses 2 million views SAKAL

Adipurush Leak On You Tube News: आदिपुरुष सिनेमा बॉक्स ऑफीसवर दणकुन आपटला. सिनेमावर चौफेर टिका झाली. आदिपुरुष सिनेमा ज्या बजेटमध्ये रिलीज झाला तेवढी कमाई सिनेमाला करता आली नाही. त्यामुळे प्रभासच्या सिनेमावर फ्लॉपचा शिक्का बसला.

अशातच दुष्काळात तेरावा महिना अशी गोष्ट आदिपुरुष बद्दल घडलीय. आदिपुरुष यु ट्यूबवर लीक झालाय.

(Adipurush film LEAKED on YouTube ahead of OTT release; crosses 2 million views )

Adipurush film LEAKED on YouTube ahead of OTT release; crosses 2 million views
Cyrus Brocha Evicted: खराब प्रकृती, वजन कमी, मध्यरात्री सायरस ब्रोचा Bigg Boss Ott 2 मधुन बाहेर

'आदिपुरुष' हा चित्रपट यूट्यूब प्लॅटफॉर्मवर लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. News18 च्या वृत्तानुसार, हा चित्रपट YouTube वर HD मध्ये पाहण्यासाठी उपलब्ध झालेला.

आणि काही वेळातच 2.3 मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिला. मात्र, आता आदिपुरुष चित्रपट युट्यूबवर हटवला आहे.

दरम्यान, चित्रपट यूट्यूबवर लीक झाल्याने आदिपुरुषच्या निर्मात्यांना आता नवा धक्का बसला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा चित्रपटबॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे.

त्याचवेळी हा चित्रपट ऑनलाइन पायरसीचा बळी ठरला आहे. आदिपुरुष यूट्यूबवर लीक झाल्याने सिनेमाच्या मेकर्सना धक्का बसलाय.

न्यूज18 च्या बातमीनुसार, आदिपुरुषची HD प्रिंट यूट्यूबवर उपलब्ध आहे आणि त्याला आतापर्यंत 23 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, काही तासांनंतर ही लिंक काढून टाकण्यात आली.

चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले आहे. या चित्रपटातील संवादामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे अनेकांचे मत आहे.

Adipurush film LEAKED on YouTube ahead of OTT release; crosses 2 million views
सात समुंदर पार.. पुण्याची विनम्र अभिनेत्री Priyadarshini Indalkar

आदिपुरुषच्या लेखकाने मागितली माफी

मनोज मुंतशीर यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आदिपुरुष' चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो.

माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.

आपल्या सर्वांना एक आणि अतूट राहण्याची आणि आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!' अशी पोस्ट मनोज मुंतशीर यांनी केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com