Adipurush Twitter Review: रामाच्या भक्तांनाच नव्हे तर अख्ख्या पब्लिकला कसा वाटला आदिपुरुष...

Adipurush Twitter Review:
Adipurush Twitter Review:Esakal

Adipurush Twitter Review: गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात आदिपुरुषची चर्चा होती. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आज आला आहे. आज आदिपुरुष चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

गेल्या अनेक दिसांपासुन या चित्रपटाची क्रेझ पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडेल यात काही शंकाच नसल्याच बोलल जात आहे. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज नंतरही अनेक वादही झाले.

मात्र तरीही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम होती. आता प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आणि आता सोशल मिडियावर या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तुम्ही जर हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार असाल तर आधी या प्रतिक्रिया एकदा वाचाच..

सोशल मीडियावर प्रभासच्या आदिपुरुषची खुपच चर्चा आहे. ट्विटरवर चित्रपट ट्रेंड करत आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षक 'जय श्री राम'च्या घोषणा देत आहेत.

ट्विटरच्या प्रतिक्रियांनुसार, प्रभासचा हा चित्रपट सुपरहिट ठरणार आहे. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर आता प्रभासच्या 'बाहुबली'सारखाच हा चित्रपट रेकॉर्ड करणार आहे.

लोक या चित्रपटाचे सीन सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. चाहत्यांना प्रभासचा एन्ट्री सीन सर्वाधिक आवडला आहे मात्र अॅक्शन सीक्वेन्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली आहे. आदिपुरुष हा चित्रपट नसून भावना आहे असंही नेटकरी म्हणत आहेत.

त्याचबरोबर अनेकांना पटकथा आणि संगीतही खुप आवडले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांना चित्रपटाचा पूर्वार्ध खूप आवडला आहे. मात्र दुसरा हाफ थोडा ड्रॅग केला गेला असल्यानं चाहते नारजही आहेत.

मात्र चित्रपटात काही चांगल्या गोष्टी आहेत तर काही उणिवा देखील आहे. नेटकऱ्यांच्या मते VFX आणखी चांगला करता आला असता. त्यामुळे व्हीएफएक्सवर टीका होत आहे.

बॅकग्राऊंड म्युझिक, व्हिज्युअल्स, ग्राफिक्स आणि युद्धाचे सीन्स अप्रतिम आहेत. प्रभास, क्रिती आणि सैफने उत्तम काम केलंय आहे असंही नेटकऱ्यांनी ट्विट केलयं.

दुसर्‍या एका युजरने लिहिले की, चित्रपट चांगला होता, काही व्हिज्युअल थोडेसे कंटाळवाणे होते, पण एकूणच VFX मोठ्या पडद्यावर चांगले दिसले. प्रभास अण्णा तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप अभिनंदन..

तर आदिपुरुषाला पाहून काहींना बाहुबलीची आठवण येत आहे. चित्रपटातील संवाद आणि अनेक दृश्ये बाहुबली बनलेल्या प्रभासची आठवण करून देतात. विशेष म्हणजे बाहुबलीप्रमाणेच प्रभासने आदिपुरुषमध्ये राम आणि त्याचे वडील दशरथ यांची भूमिका साकारली आहे. जे त्याला बाहुबली याचित्रपटाची खूप साम्य साधते.

500 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आलेला आदिपुरुषच्या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर, यात प्रभास राघवच्या भूमिकेत आणि क्रिती सेनन जानकीच्या भूमिकेत आहे. सैफने आदिपुरुषमध्ये लंकेशची भूमिका साकारली आहे.

तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत, देवदत्त नाग बजरंगच्या भूमिकेत, वत्सल सेठ मेघनाथच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सोनल चौहान आणि तृप्ती तोरडमल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

नेटकऱ्यांच्या रिव्हूनुसार एकदा तरी आदिपुरुष बघायला जाण्यास काहीच हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com