Aditya Roy Kapoor-Ananya : तो 'हो' म्हणाला, मी 'नाही' का म्हणू?

फॅशन जगतामध्ये भलेही अनन्याचे मोठे नाव असेल पण अॅक्टिंगमध्ये तिला मोठी मेहनत करावी लागणार असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
Aditya roy kapoor and ananya panday again spotted
Aditya roy kapoor and ananya panday again spotted esakal

Aditya roy kapoor and ananya panday again spotted : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेयरवर अखेर शिक्कामोर्तब झाले. परदेशात एका ठिकाणी फिरतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकाच चर्चेला सुरुवात झाली. अनन्या आदित्यच्या प्रेमात पडली. यासगळ्यावर पुन्हा एका फोटोनं चर्चेला उधाण आले आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला तिच्या अॅक्टिंगच्या मानानं मिळालेल्या प्रोजेक्टसची संख्या मोठी आहे. मात्र तिला अजूनही स्वताची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसून येते. फॅशन जगतामध्ये भलेही अनन्याचे मोठे नाव असेल पण अॅक्टिंगमध्ये तिला मोठी मेहनत करावी लागणार असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गेल्या काही वर्षात तिचे प्रदर्शित झालेले चित्रपट यात गहराईया, लायगरमधून तिनं प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यानंतर येत्या काळात आणखी काही बिग बजेट चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशावेळी अनन्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या अनन्या प्रेमात आहे. प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत तिचं नाव जोडलं जात आहे. या दोघांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

चाहत्यांनी त्या दोघांच्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. लाईक्स आणि कमेंट करुन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या अनन्या आणि आदित्यचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे ते लाईमलाईटमध्ये आले आहेत. एका हॉटेलमध्ये ते बसले असून त्यांच्या समोर ड्रिंकचा ग्लास आहे. तो व्हिडिओ विरल भयानीने व्हायरल केले आहे. यावरील व्हायरल झालेल्या कमेंट्स मध्ये अनेकांनी त्यांनी कशाप्रकारे प्रपोझ केले असेल याविषयी भन्नाट मीम्स पोस्ट केले आहे.

Aditya roy kapoor and ananya panday again spotted
Niyat Movie Review : कमजोर कथेमुळे निराश करणारा चित्रपट!

दुसऱ्या फोटोमध्ये अनन्यानं आदित्यची गळाभेट घेतली आहे. ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसून आले आहे. सध्या आदित्य आणि अनन्या हे लिस्बनमध्ये आहेत. अनन्यानं काही दिवसांपूर्वी लिस्बनमधील एका कॉन्सर्टचा फोटो देखील पोस्ट केला होता. बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या रिलेशनशिपविषयी सुतोवाच केले होते. आणि ती बातमी आता खरी होताना दिसते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com