आदित्य आणि दिशाच्या मैत्रीला बहार! दोघांनी दिल्या एकमेकांना गोड शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 14 June 2020

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचा वाढदिवस काल (१३ जून) झाला. त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने दिशाने सोशल मीडियाव्दारे आदित्य ठाकरे यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

मुंबई  ः  महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचा वाढदिवस काल (१३ जून) झाला. त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने दिशाने सोशल मीडियाव्दारे आदित्य ठाकरे यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात तिने म्हटले की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा. या मॅसेज बरोबरच स्माईली हार्टवाला इमोजीसुद्धा दिशाने पोस्ट केला.

आता आदित्य ठाकरे यांनीदेखील दिशाला ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ‘धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी १३ जून रोजी वाढदिवसानिमित्त ‘तुलासुद्धा शुभेच्छा’ असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर’, म्हणत आदित्य ठाकरेंनी दिशाला शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे आणि दिसा पटानी यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मुलाखतीमध्ये त्यांच्या मैत्रीबद्दल प्रश्नही विचारण्यात आले आहेत. आता दोघांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एकमेकाला शुभेच्छा दिल्यामुळे दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya thackray and disha patani exchanged sweet greetings