'व्हायरस' पिच्छा सोडेना;  रँचोपाठोपाठ फरहानलाही कोरोना

aamir and r madhavan
aamir and r madhavan
Updated on

अभिनेता आमिर खानपाठोपाठ आता अभिनेता आर. माधवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. माधवनने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. आमिर आणि माधवनने 'थ्री इडियट्स' या सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं. त्याच चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो पोस्ट करत माधवनने ट्विट केलं. 'फरहानने रँचोचा पाठलाग केलाच पाहिजे आणि व्हायरस नेहमीच आमच्या मागे लागला आहे. पण यावेळी त्याने आम्हाला पकडलं', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. आता राजू याठिकाणी येऊ नये हिच आमची इच्छा आहे, असंही त्याने म्हटलंय. 'थ्री इडियट्स' चित्रपटात आमिरने रँचो, माधवनने फरहान आणि शर्मन जोशीने राजूची भूमिका साकारली होती. तर कॉलेजच्या प्राध्यापकाची भूमिका साकारणाऱ्या बोमन इराणी यांना चित्रपटात 'व्हायरस' या नावाने हाक मारायचे. याच चित्रपटाचा संदर्भ देत माधवनने हे ट्विट केलं. 

आर. माधवनचं ट्विट- 
'फरहानने रँचोचा पाठलाग केलाच पाहिजे आणि व्हायरस नेहमीच आमचा पाठलाग करत होता. पण यावेळी त्याने आम्हाला पकडलं. पण ऑल इज वेल (सर्वकाही ठीक आहे) आणि कोव्हिडवर मी लवकरच मात करेन. पण हीच अशी एक जागा आहे, जिथे राजू येऊ नये असं आम्हाला वाटतं. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद आणि माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे', असं माधवनने ट्विटरवर लिहिलं. 

याआधी आमिरला कोरोनाची लागण झाली असून तो घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. अभिनेता रोहित सराफलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत आजपर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ५,१८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com