कोण आहे कल्कीचा नवीन बाॅयफ्रेंड..

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

खुप कमी चित्रपटात पण आपल्या अभिनयाने बा्ॅलिवूडमध्ये आपले वेगळेच अधिराज्य निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलीन होय. ती सध्या तिच्या नवीन बाॅयफ्रेंडमुळे चर्चेत आहे.

मुंबई : खुप कमी चित्रपटात पण आपल्या अभिनयाने बा्ॅलिवूडमध्ये आपले वेगळेच अधिराज्य निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलीन होय. कल्कीने कायमच तिच्या भूमिकांमधील वेगळेपण जपण्याला प्राधान्य दिलं आहे. अशी ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याविषयी फार मोकळेपणाने व्यक्त होत नाही. पण, आता मात्र वारे वेगळ्याच दिशेने वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे.  
  
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. ज्यानंतर त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीवर जास्त भर दिला. मुख्य म्हणजे त्यांच्या खासगी आयुष्यातही यादरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. अनुरागच्या प्रेमप्रकरणाने साधारण वर्षभरापूर्वी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामागोमागच आता कल्कीच्या आयुष्यात असणाऱ्या खास व्यक्तीविषयीची चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेला एक फोटो.

काही दिवसांपूर्वीच कल्कीने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला होता. ज्यानंतर तिने पुन्हा पोस्ट केलेला फोटो पाहता एका अर्थी या नात्यावर तिच्याकडून शिक्कामोर्तबच करण्यात आलं आहे, असं म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला कल्कीच्या आयुष्यात प्रेम परतलं असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे अनुरागसोबतचं तिचं नातं फार कमी काळातच दुरावलं असलं तरीही सध्याच्या घडीला ते दोघंही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. किंबहुना त्यांनी नुकतच 'सेक्रेड गेम्स' या प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या निमित्ताने एकत्र काम केलं होतं.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After divorce with bollywood producer director anurag kashyap actress kalki koechlin in new relationship