आणि Shreya Ghoshal ला पाहताच मराठमोळी गायिका Savanee Ravindra च्या अश्रूंचा बांध फुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shreya ghoshal, savanee ravindra,

आणि Shreya Ghoshal ला पाहताच मराठमोळी गायिका Savanee Ravindra च्या अश्रूंचा बांध फुटला

Shreya Ghoshal - Savanee Ravindra News: स्वतःच्या सुमधुर गायनाने अनेक श्रवणीय गाणी गाऊन दर्दी रसिकांच्या काळजात घर करणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया घोषाल. श्रेया घोषालची अनेक गाणी रसिकांच्या प्लेलिस्ट मध्ये असतात.

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) गेली अनेक वर्ष एक से बढकर एक गाणी गात आहे. याच श्रेया घोषालला भेटून मराठमोळी गायिका सावनी रवींद्रच्या अश्रूंचा बांध फुटला.

(after meeting with Shreya Ghoshal, Savanee Ravindra burst into tears)

सावनीने सोशल मीडियावर काही फोटो शेयर केलेत. या फोटोत सावनी श्रेयाला मिठी मारून ढसाढसा रडताना दिसत आहे. श्रेया सावनीला सावरताना दिसतेय. या अनुभवाबद्दल सावनीने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्यात.

सावनी लिहिते.. मला काही बोलायची गरज आहे का? मला वाटतं फोटो शब्दांपेक्षा जास्त बोलके आहेत. तिला पाहताच मी अगदी थक्क झाले आणि मला कळायच्या आतच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..."

सावनी पुढे लिहिते.. जेव्हा माझी मैत्रिण चैतालीने माझी तिच्याशी ओळख करून दिली. तेव्हा सावनी अत्यंत नम्र स्वरात म्हणाली "नक्कीच सावनी मी तुला ओळखतो, तू जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलास तेव्हा मी तुला गुगल केले होते आणि तू पुरस्कार जिंकलेलं गाणंही मी शोधलं होतं!

पण दुर्दैवाने ते सापडले नाही... कृपया ते गाणं लवकरच रिलीज कर...मला ऐकायचं आहे" किती गोड होतं तिचं बोलणं! धन्यवाद श्रेया घोषाल मॅडम मला आयुष्यभराचा अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल! तू माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होतीस आणि राहशील!

अशा शब्दात सावनीने तिच्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्यात.

एका पुरस्कार सोहळ्यात सावनी आणि श्रेया यांची भेट झाली. बार्डो सिनेमातील रान पेटलं या गाण्यासाठी सावनीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनीला सन्मानित करण्यात आले. जिची गाणी ऐकत एक अनोखी प्रेरणा मिळते अशा दिग्गज गायिका श्रेया घोषालला भेटून सावनीला खूप आनंद झाला. आणि शब्दांऐवजी तिच्या भावना डोळ्यातील अश्रूंवाटे व्यक्त झाल्या.