Marathi Serial: 'सुकन्या- स्वानंदी' घेऊन येतायत खोडकर सुन, खट्याळ सासू.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aga aga sunbai kay mhanta sasubai new serial on zee marathi cast sukanya mone and swanandi tikekar

Marathi Serial: 'सुकन्या- स्वानंदी' घेऊन येतायत खोडकर सुन, खट्याळ सासू..

Aga aga sunbai kay mhanta sasubai: आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय किंवा आईला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय, एकदा मुलगी सून झाली की तिच्यासाठी आपली आई सासूच असते. सासूची आई होणं तसं दुरापास्तच. अशाच एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासू मधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे "अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई" लवकरच आपल्या भेटीला येत आहे..

(Aga aga sunbai kay mhanta sasubai new serial on zee marathi cast sukanya mone and swanandi tikekar)

हेही वाचा: Amey Wagh: मराठमोळ्या अमेय वाघवर विकी कौशल फिदा.. म्हणाला, मित्रा तुझ्यासोबत..

आजच्या आधुनिक काळात, सासू सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास या मालिकेत बघायला मिळेल. "तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना" असं हे दोघी मधलं नातं वेगेवगळ्या प्रसंगातून धमाल उडवत असताना त्यांच्या सासू सुनेच्या नात्यावर सासऱ्यांची खुमासदार टिप्पणी त्या नात्याचे विविध पैलू उलगडून दाखवते. ह्या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी असणार आहेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर.

सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल याची नक्की खात्री वाटते. “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई” ही भन्नाट मालिका २१ नोव्हेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता झी मराठी वाहिनीवर येणार आहे.

टॅग्स :Marathi Serial