Photo: 'बबड्या'चा 'गजनी' लूक सोशल मीडियावर चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashutosh patki

Photo: 'बबड्या'चा 'गजनी' लूक सोशल मीडियावर चर्चेत

'अग्गंबाई सासूबाई' Aggabai Sasubai या मालिकेत 'बबड्या' ऊर्फ सोहमची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की Ashutosh Patki सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे आशुतोषने पोस्ट केलेला त्याचा नवीन फोटो. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर आशुतोषने नुकताच त्याचा नवीन लूक पोस्ट केला आहे. त्याचा हा नवीन लूक पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. आशुतोषच्या या नव्या लूकची तुलना 'गजिनी' या चित्रपटातील आमिर खानच्या लूकशी केली आहे. (aggabai sasubai fame babadya aka ashutosh patki gajini look viral on social media)

'जेव्हा स्वत:चेच केस कापण्याचा प्रयत्न फसतो', असं मजेशीर कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. काहींना बबड्याचा हा नवीन लूक आवडला असून चित्रपटांमधील विविध भूमिकांशी त्याची तुलना केली जातेय. तर मालिका सोडल्यानंतर आता काय करतोय, असा प्रश्नही नेटकऱ्यांनी त्याला विचारला.

हेही वाचा: मराठी मालिकांमध्ये खलनायकी पात्र गाजवणारे कलाकार

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील 'बबड्या'ची भूमिका आशुतोषने चांगलीच गाजवली. सोशल मीडियावर त्यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते. तर शुभ्रा आणि सोहम ही नवीन जोडीसुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. सध्या तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की दोघांनीही ही मालिका सोडली आहे. ही मालिका आता नव्या रुपात 'अग्गंबाई सूनबाई' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Web Title: Aggabai Sasubai Fame Babadya Aka Ashutosh Patki Gajini Look Viral On Social

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..