Sampath J Ram: प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या..आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल

Sampath J Ram
Sampath J RamEsakal
Updated on

साउथ फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता जे राम संपत याने आत्महत्या केली आहे. अवघ्या 35व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जे राम संपतच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. संपतने मुख्यतः कन्नड टीव्ही इंडस्ट्रीत काम केले आहे.

संपत जे. राम हा कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता होता. त्यांने शनिवारी नेलमंगळा येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्याच्या निधनावर कन्नड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

Sampath J Ram
Samantha चा 'शाकुंतलम' तोंडावर आपटला.. अभिनेत्रीच्या स्टारडमपुढे शोभेना कमाईचा आकडा.. वाचा

'अग्निसाक्षी'सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये त्याने काम केले होते. याशिवाय 'श्री बालाजी फोटो स्टुडिओ' या चित्रपटातही त्याने काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केले. चित्रपट दिग्दर्शक राजेश ध्रुव यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट लिहून अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले.अभिनेत्याच्या चाहत्यांनाही या बातमीने धक्का बसला आहे.

Sampath J Ram
Urvashi Rautela: आता बस्स..खपवून घेणार नाय! खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर उर्वशी भडकली..नोटिसच पाठवली..

रिपोर्ट्सनुसार, संपतचे एक वर्षापूर्वीच लग्न केले होते. अपेक्षेप्रमाणे चित्रपट आणि टीव्ही शोच्या ऑफर न मिळाल्याने तो नैराश्यात गेला होता, आर्थिक अडचणींमुळे त्याने आत्महत्या केली." तथापि, अद्याप त्याच्या कुटुंबीयांकडून किंवा मित्रांकडून याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही. त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी एनआर पुरा येथे हलविण्यात येणार आहे.

Sampath J Ram
Kangana Ranaut: ज्यांना शिव्या घालते त्याच्याच पार्टीत कशी गेलीस तू? नेटकऱ्यांनी कंगनाला झापलं..

संपत जयरामचा अग्निसाक्षी सहकलाकार विजय सुरिया यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की संपत एक अभिनेता म्हणून चांगल्या ऑफर्सची वाट पाहत आहे. दिवंगत अभिनेत्याचा सहकलाकार राजेश ध्रुव यांनीही सोशल मीडियावर न हृदयद्रावक पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com