Ahan Shetty Breakup: ११ वर्षांच नातं तुटलं! सुनील शेट्टीचा लेक अहानचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप

सुनील शेट्टीच्या लेकाचं ब्रेकअप झालंय
Ahan Shetty Breakup with 11 years of relationship girlfriend tania shroff
Ahan Shetty Breakup with 11 years of relationship girlfriend tania shroffSAKAL

Ahan Shetty Breakup With Girlfriend News: सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आहे. अहानचे 11 वर्षे जुने रिलेशनशीप तुटल्याची बातमी समोर आलीय.

बातम्यांनुसार, अहानने त्याची अनेक वर्षांपासूनची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप केले आहे. काय घडलं नेमकं जाणून घ्या.

Ahan Shetty Breakup with 11 years of relationship girlfriend tania shroff
Elvish Yadav: "...तेव्हा कलियुगाचा अंत होईल!" जम्मूमध्ये मारहाण प्रकरणावर एल्विशने सोडलं मौन

सुनील शेट्टीचा मुलगा अहानचं ब्रेकअप!

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अहान आणि तानिया यांचं ब्रेकअप होऊन दीड महिना झाला आहे. दोघेही 11 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अहान आणि तानिया लहानपणापासून एकत्र शिकले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. अगदी शाळेपासून या दोघांची लव्हस्टोरी आहे. पण आता हे जोडपे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे.

काय आहे ब्रेकअपचं कारण?

अहान आणि तानिया यांच्या ब्रेकअपचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचबरोबर अहान आणि तानियाकडूनही या बातमीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण दोघांनीही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबतची एकही पोस्ट शेअर केलेली नाही. याशिवाय कोणत्याही पार्टी, इव्हेंटमध्ये अहान - तानिया एकत्र दिसले नाहीत. तरीही दोघांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Ahan Shetty Breakup with 11 years of relationship girlfriend tania shroff
Gautami Deshpande: गौतमी देशपांडे करणार लग्न! मेहंदीचे फोटो व्हायरल, कोण आहे होणारा नवरा?

अहानची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफबद्दल माहिती?

अहानने जिच्यासोबत ब्रेकअप केलं ती तानिया श्रॉफ प्रसिद्ध मॉडेल असून उद्योगपती जयदेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. ती नामांकित उद्योगपतींच्या कुटुंबातील आहे. अहानबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो तारा सुतारियासोबत 'तडप' चित्रपटात दिसला होता.

तानिया श्रॉफ अनेकवेळा सुनील शेट्टीच्या घरगुती कुटुंबासोबत दिसली आहे. 'तडप'च्या स्क्रिनिंगदरम्यानही ती अहानसोबत दिसली होता. सुनील शेट्टीनेही तानियाचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, "तो तानियाला आपल्या मुलीप्रमाणे मानतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com