
“डॉक्टरांनी रेमोची अँजिओग्राफी केली असून पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत”, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेलने दिली होती.
मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. “डॉक्टरांनी रेमोची अँजिओग्राफी केली असून पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत”, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेलने दिली होती. आता रेमोचा खास मित्र आणि कोरिओग्राफर अहमद खान याने त्याचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत.
हे ही वाचा: 'द डर्टी पिक्चर' फेम अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा कोलकत्त्याच्या घरी आढळला मृतदेह
अहमद खान यांनी ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रेमोचे हेल्थ अपडेट देताना सांगितलं की, “रेमोला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचं मला फोनवर सांगण्यात आलं होतं. आम्ही सगळे काळजीत होतो मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे.” हेल्थ आणि फिटनेसच्या बाबतीत जागरुक राहणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका यावा याबाबत अहमदने खर तर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “जो व्यक्ती त्याच्या हेल्थ आणि फिटनेसबद्दल इतकी काळजी घेतो त्याच्यासोबत असं घडावं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासालाच मोठा धक्का बसतो” अशा शब्दांत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रेमो सध्या आयसीयूमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रेमोने अनेक गाण्यांची कोरिओग्राफी करण्याव्यतिरिक्त त्याने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या सिनेमांंचं दिग्दर्शन केलं आहे. ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिऍलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून होता. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी शोमधून रेमोचं नाव घराघरात पोहोचलं.
कुल आणि शांत स्वभावाचा परिक्षक म्हणून रेमोला ओळखलं जातं. टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत त्याने या शोमध्ये परीक्षकाची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. नंतर याच रिऍलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासाठी रेमो काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला.
ahmed khan opens up on choreographer remo d souza shares health update