esakal | Video : ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा अफलातून डान्स पाहिलात का?
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwarya Narkar with son amey

Video : ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा अफलातून डान्स पाहिलात का?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रातून आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर Aishwarya Narkar सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर ऐश्वर्या त्यांचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यांच्या अभिनयाची, सौंदर्याची, इतकंच काय तर पती अविनाश नारकर यांच्यासोबतच्या त्यांच्या जोडीची अनेकदा चर्चा होते. पण यांचा मुलगा लाइमलाइटपासून थोडा दूरच आहे. अमेय नारकर Amey Narkar असं त्यांच्या मुलाचं नाव असून तो सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे आणि ते कारण म्हणजे अमेयचा अफलातून डान्स. (aishwarya narkar son amey narkar dance video viral on social media)

अमेयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या डान्सचे बरेच व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमधील अमेयचा उत्साहपूर्ण आणि अफलातून डान्स पाहून नेटकरी भारावले आहेत. ट्रेंडमध्ये असलेल्या अनेक गाण्यांवर त्याने भन्नाट डान्स केला आहे.

हेही वाचा: प्राणीप्रेमी मराठी कलाकार; कोणाकडे दहा मांजरी तर कोणी पक्ष्यांना दिले जीवदान

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्याप्रमाणे अमेयसुद्धा अभिनयक्षेत्रात काम करणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्याच्या डान्सचे अनेक चाहते सोशल मीडियावर आधीपासूनच आहेत. अमेय विविध थिएटर ग्रुपसोबतही काम करतो.