ऐश्वर्या 'पनामा पेपर प्रकरणात' ही अडकली होती! काय होती ही घटना? | Aishwarya Rai Bachchan Bollywood actress panama | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aishwarya look news

Panama Papers Leak : ऐश्वर्या 'पनामा पेपर प्रकरणात' ही अडकली होती! काय होती ही घटना?

Aishwarya Rai Bachchan Bollywood actress panama paper leak case : बॉलीवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉयला ईडीनं नोटीस धाडली. पनामा पेपर्स प्रकरणात देखील तिचे नाव आले होते. तिनं विदेशी मुद्रा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. ऐश्वर्याचं नाव पनामा पेपर लिक प्रकरणात येताच बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यावरुन वेगळयाच चर्चेला उधाण आले होते.

त्यावेळी ऐश्वर्याची ईडीनं तब्बल पाच तास चौकशी केली होती. ऐश्वर्यावर कायदेशीर कारवाई यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या २२ हजारांचा कर न भरल्याप्रकरणी चर्चेत आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील एका गावात ऐश्वर्याची गुंतवणूक आहे.

२०१७ मध्ये जेव्हा ईडीनं परकीय चलनाचे उल्लंघन यावर चौकशी सुरु केली होती. तेव्हा बच्चन कुटूंबियांना नोटीस पाठवण्यात आली होती. यावर भारतीय रिझर्व बँकेनं बच्चन यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. यासगळ्या प्रकरणाची मीडियानं मोठ्या प्रमाणात दखल घेतली होती.

हेही वाचा: Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, २००४ मध्ये एमिक पार्टनर्सचा एका ब्रिटिश व्हर्जीन द्विपसमुहामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये ऐश्वर्या राय संचालक होती. असा उल्लेख आहे. मोसेक फोसेन्कानं या कंपनीला रजिस्टर केले होते. त्याचे भांडवल ५० हजार डॉलर होते. तर काही अभिनेते २००९ मध्ये कंपनीतून बाहेर पडले होते.

हेही वाचा: Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायने थकवला २२ हजारांचा टॅक्स, मिळाली नोटीस

पनामा पेपर लिक प्रकरण होतं तरी काय?

जर्मन वृत्तपत्र सुद्देत्सुशे झिएटुंग ने पनामा पेपर्स या नावानं ३ एप्रिल २०१६ मध्ये एक डेटा रिलिज केला होता. त्यामद्ये त्यांनी भारताबरोबरच दोनशे देशांमधील राजकारणी, प्रसिद्ध सेलिब्रेटी यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यात १९७७ पासून २०१५ पर्यत वेगवेगळ्या घटना आणि आरोपांचा समावेश होता. या पेपरमध्ये बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्याच्या नावाचा उल्लेख होता.

हेही वाचा: Ved Movie Box Office Collection : सैराटचा विक्रम मोडला! सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये...

ऐश्वर्याचे नाव पनामा पेपरमध्ये आल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. पनामाच्या त्या लिस्टमध्ये तब्बल तीनशे भारतीयांची नावं होतं. त्यामुळे वेगळ्याच चर्चेचाला सुरुवात झाली होती. ऐश्वर्याबरोबरच बिग बी अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या नावाचा देखील त्यामध्ये समावेश होता.