अजय देवगण कमी वयाच्या मुलीशी करतोय फ्लर्ट; 'दे दे प्यार दे'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

आज अजय देवगणच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त 'दे दे प्यार दे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण एका रोमँटिक कॉमेडी चिभपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री तब्बू आणि रकुल प्रीत या देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'दे दे प्यार दे'.

आज अजय देवगणच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त 'दे दे प्यार दे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरचा ट्रेंडही बघायला मिळत आहे. 

'दे दे प्यार दे' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तब्बू व रकुल यांचे वादविवाद पाहायला मिळत आहेत. ट्रेलर पाहिल्यावर कळते की, अजयला (अजय) रकुल आवडते. रकुल त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असते. रकुल जेव्हा त्याच्या घरी जाते तेव्हा तिला कळते अजयची एक्स वाईफ मंजूही (तब्बू) तिथे आहे आणि त्यांना आयशा (रकुल प्रीत)च्या वयाची मुले आहेत. ट्रेलरमध्ये करीना आणि सैफचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. अकीव अली यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Devgan Starrer De De Pyar De Films Trailer Release