न्युझीलँडमध्ये थिएटर झाले खुले,अजय देवगणचा 'हा' सिनेमा झाला सगळ्यात पहिले रिलीज

टीम ई सकाळ
Wednesday, 24 June 2020

न्युझिलँडमध्ये थिएटर सुरु झाल्यानंतर हा पहिला हिंदी सिनेमा आहे जो प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.

मुंबई- न्युझिलँड त्या देशांपैकी एक देश आहे जो हळूहळू कोरोनामुक्त होतोय. जनजीवन पूर्ववत होतंय आणि व्यवहार देखील हळूहळू रुळावर येत आहेत. यादरम्यान आता न्युझीलँडवरुन अशी बातमी समोर येत आहे जी भारतीय सिनेमांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' हा सिनेमा न्युझिलँडच्या थिएटरमध्ये रिलीज केला जातोय. न्युझिलँडमध्ये थिएटर सुरु झाल्यानंतर हा पहिला हिंदी सिनेमा आहे जो प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. याविषयीची माहिती या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते रिलाईंस एंटरटेन्मेंट यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन दिली आहे. 

हे ही वाचा:  'कॉफी विथ करण'मध्ये अक्षय कुमारला हा प्रश्न विचारल्यावर त्याने थेट करणचाच घेतला क्लास

'गोलमाल अगेन' हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' सिनेमाची फ्रँचायजीचा चवथा सिनेमा आहे जो २०१७ मध्ये रिलीज झाला होता.या सिनेमात अजय देवगण, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु, तुषार कपूर, परिणीती चोप्रा, तब्बु सारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.हा सिनेमा रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत जगभरात ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु होतं मात्र हळूहळू आता जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर हा सिनेमा न्युझिलँडमधील थिएटरमध्ये मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन सुरु होतं. मात्र ज्या देशात कमी लोकसंख्या ते देश आता हळूहळू कोरोनामुक्त होत आहेत.

काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने देखील लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर थिएटर सुरु करण्यात आले असण्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी दिवंगत अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मिडियम' हा सिनेमा पहिले रिलीज करण्यात आला आहे. न्युझिलँडमधून अनेक दिवसांपासून अशी माहिती येत आहे की हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते जेम्स कॅमेरन यांनी त्यांच्या 'अवतार' या सिनेमाच्या सिक्वेलचं शूट सुरु केलं आहे.    

ajay devgn and rohit shetty golmaal again release in movie theater in new zealand after lockdown  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay devgn and rohit shetty golmaal again release in movie theater in new zealand after lockdown