Ajay Devgn: "माझ्या आतला मावळा जागवला!", 'तान्हाजी' ला ४ वर्ष होताच अजयने केले छत्रपती शिवरायांचे स्मरण

अजय देवगणने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलंय
ajay devgn remembers 4 years tanhaji movie and chhatrapati shivaji maharaj
ajay devgn remembers 4 years tanhaji movie and chhatrapati shivaji maharaj SAKAL

Ajay Devgn News: अजय देवगण हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. RRR सिनेमाच्या माध्यमातून अजयने साऊथमध्ये सुद्धा यशस्वी अभिनय केलाय. अजयचे सिनेमे पाहण्यासाठी लोकं उत्सुक असतात.

अजय देवगणने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलंय. यामागचं कारण म्हणजे तान्हाजी सिनेमाला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमात अजयने तान्हाजी मालुकरेंची भूमिका साकारली आहे. काय म्हणाला अजय? वाचा.

ajay devgn remembers 4 years tanhaji movie and chhatrapati shivaji maharaj
Satyashodhak: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

आज अजय देवगणच्या सुपरहिट तान्हाजी सिनेमाला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अजयने ट्विटरवर एक खास व्हिडीओ पोस्ट केलाय.

हा व्हिडीओ पोस्ट करुन अजय लिहीतो, "तान्हाजीच्या सेटवर मी शिकलेल्या आठवणी आणि धडे या गोष्टींनी माझ्या आतल्या मावळ्याला जागवले. माय भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती मला आजही वास्तविक जीवनात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तान्हाजी बनण्याची ताकद देते. जय भवानी! जय शिवाजी!"

अशी खास पोस्ट अजयने केली आहे.

तान्हाजी सिनेमाबद्दल थोडंसं...

तान्हाजी हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'तान्हाजी' हा चित्रपट याच दिवशी म्हणजेच १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सैफ अली खान, शरद केळकर, काजोल आणि नेहा शर्मा सारखे स्टार्सही दिसले होते.

सिनेमात शरद केळकरने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चांगलीच गाजली.

अजय देवगणच्या पोस्टवर यूजर्सनेही तान्हाजी सिनेमाची आठवण काढली असून पसंती दर्शवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com