Ajay Devgn and Tabu
Ajay Devgn and TabuSakal

Bholaa 2nd Teaser: अजय देवगणच्या 'भोला'चा दुसरा टीझर या दिवशी होणार लाँच

अजयने त्याच्या आगामी 'भोला' या चित्रपटाची घोषणाही केली आहे. ज्याचा टीझर आणि अनेक पोस्टर्सही सोशल मीडियावर समोर आले आहेत.
Published on

हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अजय देवगण सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी अजयने 'दृश्यम 2' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. एवढेच नाही तर अजयने त्याच्या आगामी 'भोला' या चित्रपटाची घोषणाही केली आहे. ज्याचा टीझर आणि अनेक पोस्टर्सही सोशल मीडियावर समोर आले आहेत.

दरम्यान, आता अजय देवगणने 'भोला' चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरची रिलीज डेट जाहीर केली आहे. याआधी तुम्हाला माहित आहे का की अजय देवगण आणि सुपरस्टार अभिनेत्री तब्बू स्टारर 'भोला' हा एका सुपरहिट साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. रविवारी, बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'भोला' चित्रपटाची नवीनतम पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अजयने 'भोला'चे लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहे.

Ajay Devgn and Tabu
Samruddhi Kelkar: कीर्तीचं मालिकाविश्वात दमदार कमबॅक, आता दिसणार या भूमिकेत

'भोला'च्या या पोस्टरमध्ये अभिनेत्री तब्बू तुम्हाला कॉप अवतारात दिसणार आहे. याशिवाय बॅकग्राउंडमध्ये अजय देवगणची झलकही पाहायला मिळणार आहे. या पोस्टरसोबत अजय देवगणने कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे की, 'भोला'चा दुसरा टीझर मंगळवारी म्हणजेच 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत अजयच्या या घोषणेनंतर चाहत्यांची भोला या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 'भोला'च्या या दुसऱ्या टीझरच्या रिलीजची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

खरं तर अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपट 'भोला' हा दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार कार्थीचा सुपरहिट चित्रपट 'कैथी'चा रिमेक आहे. कैथी2019 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला, त्यामुळेच 'कैथी' सुपरहिट ठरला. अशा परिस्थितीत आता अजय देवगणने 'कैथी'चा रिमेक बनवून मोठा डाव खेळला आहे. अशा परिस्थितीत 'कैथी'चा हा रिमेक यशस्वी होणार की नाही हे पाहावे लागेल. 'भोला' हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com