वडिलांच्या शेवटच्या क्षणाबद्दल सांगताना अजिंक्य देव भावुक

Ramesh Deo-Ajinkya Deo
Ramesh Deo-Ajinkya Deo

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo), मुलगा अजिंक्य देव (Ajinkya Deo), अभिनय देव (Abhinay Deo), सुना, नातवंडे असा परिवार आहे. अजिंक्य देव यांनी नुकताच एबीपी नेटकऱ्यांसोबत संवाद साधला.

'कुटुंबियांसाठी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील हा दुःखद दिवस आहे. काल (बुधवार) 6 पर्यंत हॉस्पिटलमध्ये आम्ही एकत्र होतो नॉर्मल रूममध्ये शिफ्ट ही करणार होतो ते सुद्धा अगदी सकारात्मक होते मी छान आहे. म्हणाले सगळं नॉर्मल होतं. मात्र नियतीचे खेळ आहेत, 9 वाजता त्यांना ह्रदयविकाराचा धक्का आला. त्यांना जगण्यावर प्रचंड प्रेम होतं. त्यांना खूप जगायचं होतं. अनेकदा त्यांनी याआधी यमाला मात दिली आहे. त्यांनी पूर्णपणे त्यांच्या मूल्यांवर आयुष्य जगलं. हॉस्पिटलचे आभार त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.' असं अजिंक्य देव यांनी सांगितलं.

Ramesh Deo-Seema Deo
Ramesh Deo-Seema Deo

पुढे अजिंक्य देव म्हणाले, 'त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करूया कारण ते पूर्णपणे जगले. त्यांचा पुढचा प्रवास सुखद व्हावा म्हणून प्रार्थना करा. त्यांना आणि आईला तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार.'

रमेश देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 285 हिंदी सिनेमे, 190 मराठी सिनेमे आणि 30 मराठी नाटकांत काम केले आहे. 'आनंद', 'घराना', 'सोने पे सुहागा', 'गोरा', 'मिस्टर इंडिया', 'कुदरत का कानून', 'दिलजला', 'शेर शिवाजी', 'प्यार किया है प्यार करेंगे' या रमेश देव यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com