Ajit Pawar on TDM: हे दुर्दैव, सिनेमाला लवकरात लवकर.. TDM साठी अजित पवारांनी दिला आदेश

आता या प्रकरणी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय.
 TDM, ajit pawar, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade,
TDM, ajit pawar, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade, SAKAL
Updated on

Ajit Pawar on TDM News: 'ख्वाडा', 'बबन' फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. कायमच अस्सल मातीतले हिरे वेचून त्यांना अभिनयाची संधी देणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या याही सिनेमाची चर्चा होती.

TDM सिनेमाला थिएटर मिळाले नाहीत त्यामुळे TDM चे दिग्दर्शक आणि कलाकार सर्व जण प्रेक्षकांसमोर हात जोडून ढसाढसा रडल्याची दुर्दैवी घटना घडली. आता या प्रकरणी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय.

(Ajit Pawar tweet for TDM marathi movie to get available prime time slot in theatre of maharashtra)

अजित पवारांनी ट्विटरवर TDM विषयी भाष्य करणारी पोस्ट लिहिली आहे. अजित पवार ट्विट करून लिहितात, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे.

संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी. अशाप्रकारे अजित पवारांनी थिएटर मालकांना TDM ला लवकरात लवकर प्राईम टाईम स्लॉट द्यावा असा आदेश दिलेला दिसतोय.

 TDM, ajit pawar, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade,
TDM Marathi Movie : ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या कलाकारांना थिएटरमध्ये रडू कोसळल्याचं पहायला मिळालं
 TDM, ajit pawar, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade,
ना प्रियंका ना आलिया, Met Gala 2023 अंबानींच्या लेकीची भुरळ.. ईशा अंबानीला पाहतच राहिले लोक..

TDM सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. इतकंच नव्हे तर पुण्यात TDM चे शो हाउसफुल झाले. परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा असतानाही केवळ कमी शो आहेत म्हणून TDM प्रेक्षकांना पाहता येत नाहीये.

नुकतंच TDM चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज यांनी प्रेक्षकांना हात जोडून ही दयनीय अवस्था सांगितली.

सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय, परंतु शो नसल्याने प्रेक्षकांना माघारी जावं लागतंय. या अवस्थेमुळे सर्व टीमच्या डोळ्यात पाणी आलं. "आमच्यावर प्रेशर आहे", असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केलेत. आता थिएटर मालिकांवर नेमकं कसलं प्रेशर आहे, याचा खुलासा मात्र झाला नाहीये.

आता अजित पवारांनी आदेश दिल्यावर TDM ला थिएटर मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com