जावईबापूंनी केलं सासूचं कौतूक! म्हणाला, ख्रिस्तोफरनं प्रशंसा केली आणखी काय हवं

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 December 2020

 ख्रिस्तोफर नोलानचा टेनेट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत होते.

मुंबई - हॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान हा त्याच्या आगळ्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे. त्यानं आजवर केलेल्या चित्रपटांना जागतिक पातळीवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा खास असा चाहता वर्गही आहे. विशेषत; साय फाय या जॉनरचे चित्रपट तयार करणा-या नोलानचा नुकताच एक नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात काम केलेल्या बॉलीवूड अभिनेत्रीची त्याने  केलेली प्रशंसा चर्चेचा विषय बनली आहे.

ख्रिस्तोफर नोलानचा टेनेट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कमालीचा लोकप्रियही झाला आहे. नोलानच्या चित्रपटात बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी काम केलं आहे. नोलाननं त्यांची प्रशंसा करणारी एक पोस्ट शेयर केली आहे.तसेच कपाडिया यांच्या डायरीत त्यानं त्यांच्याविषयी गौरवोदगार काढले आहेत.

ही सगळी माहिती डिंपल यांचा जावई असणा-या अक्षय कुमारनं व्टिटवर शेयर केली आहे. त्यासाठी त्यानं एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, ख्रिस्तोफरनं केलेली प्रशंसा याचा मला फार अभिमान वाटतो. त्यानं कपाडिया यांची केलेली स्तुती मोठी बाब म्हणावी लागेल. मी त्यांचा हा नवीन चित्रपट पाहणार आहे. एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल.

4 डिसेंबर टेनेट हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना डिंपल कपाडिया म्हणाल्या, मुळापासून कथेचा विचार करणे हे ख्रिस्तोफरचं वेगळेपण आहे. मी त्यांचा प्रेस्टिज हा चित्रपट चार वेळा पाहिला आहे.  नोलन यांचा चित्रीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. ते खूप लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. ज्यावेळी मला या मुव्हीसाठी साईन करण्यात आले आहे असे मला कळले त्यावेळी ट्विंकल आणि अक्षय यांनाही खूप अभिमान वाटला. माझी नातवंडे नितारा आणि आरवला आनंद झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akashay kumar commented on Dimple kapadiya and Christopher Nolan new movie Tenet