
Akshay Kelkar: 'बेबी ऑन बोर्ड..' म्हणत अक्षय केळकरनं दिली Good News..चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
Akshay Kelkar Good News: बिग बॉस मराठी ४ नंतर अक्षय केळकरला घराघरात ओळखलं जाऊ लागलं. अर्थात आधी देखील अक्षय वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून दिसला आहेच पण बिग बॉसनं त्याला ओळख दिली असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.
सोशल मीडियावर अक्षय भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो अनेकदा त्याचे व्हिडीओ,रिल्स,फोटो पोस्ट करत असतो. नुकतीच त्याच्या चाहत्यांसोबत त्यानं एक गूड न्यूज शेअर केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पहायला मिळत आहे.(Akshay Kelkar Marathi bigg boss 4 winner good news don cutting 3 post viral)
गेल्या काही दिवसांपासून अक्षय केळकर मालिकांमधनं प्रसिद्धि झोतात आलेल्या समृद्धि केळकर सोबत अनेकदा दिसतो. अर्थात सोशल मीडियावर त्यांच्या रील्स भरपूर पसंती मिळवताना दिसतात.
त्यामुळे अनेकदा नेटकऱ्यांनी त्याला याविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतंच. पण आता जाऊन कळतंय सध्या समृद्धि आणि अक्षय एकत्र फार का दिसत आहेत.
अक्षयनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे याचं उत्तर अखेर चाहत्यांना मिळालंय आणि त्यांनी दोघांचे अभिनंदन देखील केले आहे.
तर अक्षय केळकर आणि समृद्धि केळकर यांच्या चर्चेत राहिलेल्या 'दोन कटिंग' वेब फिल्मचा तिसरा भाग येत आहे. ज्याचा एक व्हिडीओ अक्षयनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, ''and good news here
Baby On Bord
Work in Progress 👨🏾💻
दोन कटिंग 1…2……नंतर तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे दोन कटिंग 3... लवकरच आपल्या फिलमबाझ फिल्म कंपनी वर .... ''
याआधी या वेब फिल्मचे दोन भाग आपल्या भेटीस आले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.