Selfiee Box Office Collection: अक्षयची जादू काही काम करेना! पाच दिवसात 'सेल्फी'ने कमावले फक्त.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar and emraan hashmi Selfiee movie Box Office Collection day 5

Selfiee Box Office Collection: अक्षयची जादू काही काम करेना! पाच दिवसात 'सेल्फी'ने कमावले फक्त..

Selfiee Box Office Collection Day 5: बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मागे लागलेलं ग्रहण काही संपायला मागेना. गेल्या वर्षभरात जणू अक्षय आणि फ्लॉप सिनेमे असे समीकरणच झाले आहे. त्यामुळे 2023 मध्ये तरी अक्षयची जादू दिसेल असे वाटले होते पण त्यावरही आता विरजण पडले आहे.

अक्षय कुमारचे यापूर्वीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. म्हणून अक्षयला नव्या वर्षातील पहिल्या रिलीज म्हणजे 'सेल्फी' कडून खूप आशा होत्या पण प्रेक्षकांनी 'सेल्फी' कडे पाठ फिरवली आहे. एवढी धडक्याने कमाई करणाऱ्या अक्षयच्या 'सेल्फी'ने पांच दिवसात अगदीच क्षुल्लक कमाई केली आहे.

(akshay kumar and emraan hashmi Selfiee movie Box Office Collection day 5)

'सेल्फी'च्या निर्मितीसाठी 150 कोटी खर्च आल्याचे चर्चा आहे. पण कमाई मात्र तशी होताना दिसत नाहीय. या चित्रपटाने पाच दिवसात केवळ बॉक्स ऑफिसवर केवळ 10 कोटींचा टप्पा पर केला.

एका बड्या कलाकाराच्या चित्रपटाला इतका कमी प्रतिसाद मिळणे हा मोठा धक्काच आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'सेल्फी'ने 2.55 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3.80 आणि तिसऱ्या दिवशी 3.80 कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी 1.3 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.10 कोटींची कमाई केली. पाच दिवसांमध्ये 'सेल्फी'ने एकूण 12.70 कोटींचा गल्ला केला आहे. म्हणजे पाच दिवसात या चित्रपटाला 20 कोटीही गाठणे शक्य झालेले नाही.

 अक्षय आणि इम्रान सोबत या चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा अधिकृत रिमेक आहे. पण तिथे चाललेला हा सिनेमा बॉलीवुडवर मात्र जादू करू शकला नाही.

2022 मध्ये रिलीज झालेले अक्षयचे बरेच चित्रपट फ्लॉप ठरले. त्या मध्ये 'बच्चन बांडे', 'रक्षाबंधन', 'सम्राट पृथ्वीराज', 'रामसेतू' या चित्रपटांचा समावेश आहे. तर लवकरच अक्षयचा 'फिर हेरा फेरी- 3 ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.