

Akshay Kumar Cricket Team: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. वाद आणि अक्षय कुमार यांचे जुने नाते आहे. आतापर्यत अक्षय कुमारचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत त्यातील बहुतांशी चित्रपटांचे जोरदार वाद झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या एका पानमसाल्याच्या जाहिरातीवरून नेटकऱ्यांच्या ट्रोलचा विषय झाला होता.
या सगळ्यात अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तो आता एका क्रिकेट टीमचा मालक झाला आहे. यापूर्वी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, जुही चावला यांनी आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटविश्वात इंट्री केली होती. त्यानंतर आता बॉलीवूडचा खिलाडी देखील त्यासाठी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे.
बॉलीवूड आणि क्रिकेटचं नातं हे फार जूनं आहे. कित्येक बॉलीवूड सेलिब्रेटींनी क्रिकेटरांशी लग्न करुन संसार सुरु केला आहे. तर अनेकांनी त्यातून बिझनेस वर्ल्ड मध्ये प्रवेश केला आहे. त्यात आणखी एका सेलिब्रेटीच्या नावाची भर पडली आहे.तो अभिनेता म्हणजे अक्षय कुमार आहे.
क्रिकेट टीमचा मालक झाला अक्षय कुमार....
अक्षय कुमारनं इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये श्रीनगरच्या टीमची खरेदी केली आहे. ही एक टेनर बॉल टी १० क्रिकेट टूर्नामेंट आहे. या लीगला २ ते ९ मार्च २०२४ रोजी सुरुवात होणार आहे. अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या हटक्या लूक्समुळे चर्चेत असतो. तो स्वत: मार्शल आर्टचा खेळाडू राहिला आहे. वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात त्याला रुची असल्याचे दिसून आले आहे.
याविषयी प्रतिक्रिया देताना अक्षयनं म्हटलं की, मी या टीमचा मालक झाल्यानंतर आनंदाची भावना आहे. येत्या काळात आम्ही त्या माध्यमातून मोठी कामगिरी करु. असा विश्वासही यावेळी अक्षयनं व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.