अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आणि रणवीर सिंहचा '83' सिनेमा यावर्षीच थिएटरमध्येच होणार रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 24 August 2020

अजुनही काही मोठे सिनेमे डिजीटलवर रिलीज होण्याच्या तयारीत आहेत तर काही सिनेमे थिएटर सुरु होण्याची वाट पाहत आहेत.याच दरम्यान प्रॉडक्शन हाऊसने 'सूर्यवंशी' आणि '83' हे सिनेमे थिएटरमध्येच रिलीज होणार यावर विश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे थिएटर्स बंद आहेत. अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. अजुनही काही मोठे सिनेमे डिजीटलवर रिलीज होण्याच्या तयारीत आहेत तर काही सिनेमे थिएटर सुरु होण्याची वाट पाहत आहेत.याच दरम्यान प्रॉडक्शन हाऊसने 'सूर्यवंशी' आणि '83' हे सिनेमे थिएटरमध्येच रिलीज होणार यावर विश्वास व्यक्त केला आहे.

हे ही वाचा: गणपतीच्या सजावटीत चूक झाल्याने अभिनेते प्रवीण तरडे ट्रोल, व्हिडिओ शेअर करत मागितली दलितबांधवांची माफी

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आणि रणवीर सिंहचा '83' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  एकीकडे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत भरगोस कमाई करत असताना दुसरीकडे मात्र निर्माते अजुनही हे सिनेमे थिएटरमध्येच रिलीज करण्यावर ठाम आहेत. आता हे सिनेमे कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे त्यांनी सोशल मिडीयावर जाहीर केलं आहे.

रिलाईंस एंटरटेन्मेंट यांनी ट्विटरवर याबाबत अनाऊन्समेंट करत म्हटलं आहे, 'आम्हाला या गोष्टीबाबत खात्री आहे की आमचा सिनेमा 'सूर्यवंशी' दिवाळीमध्ये  तर '83' हा सिनेमा नाताळमध्ये रिलीज होईपर्यंत सध्या जी थिएटर्सची परिस्थीती आहे त्यात सुधार झालेला असेल.'

याआधीही प्रोडक्शन हाऊसच्या सीईओंनी सांगितलं होतं की ते सिनेमे थिएटर्समध्येच रिलीज करणार आहेत. ते सिनेमांची तारिख पुढे ढकलु इच्छित नाहीत. त्यांनी म्हटलं होतं की 'मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षकांना हे सिनेमे दिवाळी आणि नाताळच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहता येतील.'

कबीर खान दिग्दर्शित '83' हा सिनेमा १९८३ मधील भारतीय क्रिकेट टीमने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित आहे. या सिनेमात रणवीर सिंह कपिल देवच्या भूमिकेत आहे. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' सिनेमात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ झळकणार आहेत. प्रेक्षकांना या दोन्ही सिनेमांची उत्सुकता आहे. तसंच हे सिनेमे मोठ्या पडद्यावरंच पाहण्याची प्रेक्षकांचीही इच्छा आहे.   

akshay kumar film sooryavanshi and ranveer singh film 83 makers are confident of festive releases in theatres


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar film sooryavanshi and ranveer singh film 83 makers are confident of festive releases in theatres