
अक्षयची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टसोबतच अक्षयने ट्विंकलसोबत एक सुंदर फोटो शेयर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आज ४७ वा वाढदिवस आहे. याच दिवशी ट्विंकल खन्नाचा पती अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट लिहून तिला बर्थडे विश केलं आहे. अक्षयची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टसोबतच अक्षयने ट्विंकलसोबत एक सुंदर फोटो शेयर केला आहे. ट्विंकलचे चाहतेसुद्धा सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अक्षय कुमारने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले आहे, 'आयुष्याच्या निर्णयावर प्रश्न विचारणारा आणखी एक वर्ष. आयुष्याच्या या सर्व निर्णयांमध्ये तू माझ्याबरोबर आहेस याचा मला आनंद आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा टीना.' फोटोत दोघेही पार्कमध्ये हसत आणि सायकल घेऊन पोज दिलेले दिसत आहेत. या पोस्टवर लाखोंच्या वर लाईक मिळाले आहे. ट्विंकलला अनेक चाहते बर्थडे विश करत आहेत.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिचा वाढदिवस तिचे वडिल सुपरस्टार राजेश खन्नाबरोबर शेअर करते. अक्षयने अलीकडेच 'अतरंगी रे' चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे. यात सारा अली खान आणि धनुष त्यांच्यासोबत तो दिसणार आहेत. याशिवाय अक्षयकडे 'सूर्यवंशी', 'बेल बॉटम', 'बच्चन पांडे', 'रक्षाबंधन', 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' असे चित्रपट आहेत.