अक्षयकुमार नागरिकत्वाच्या टीकेला कंटाळला; घेतला मोठा निर्णय

Akshay Kumar have applied for an Indian passport
Akshay Kumar have applied for an Indian passport

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमारला देशाच्या प्रती खूप आदर आहे आणि ते त्याच्या कृतीतून दिसून येते. देशाच्या आर्मीसाठी खास आकर्षण आहे आणि तो अनेकदा त्यांची भेट घेतो.बॉलिवूडमध्ये इतके वर्ष तो काम करतोय आणि एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकतोय. पण अक्षय कुमारचं नागरिकत्तव हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कॅनडाच्या नागरिकत्त्वामुळे त्याच्यावर अनेकदा टीकाही झाल्या. भारतातला टॉपचा अभिनेता असूनही देशाचं नागरिकत्व नसल्याने तो खूपवेळा ट्रोलही झालाय. अखेर भारताचं नागरिकत्त्व मिळवण्यासाठी अक्षयने प्रयत्न सुरु केले असून तो भारताच्या पासपोर्ट घेणार आहे. 

कॅनडाचा पासपोर्ट सोडून तो अखेर भारतीय पासपोर्ट घेणार आहे. अशी माहिती अक्षयने‘हिंदुस्तान टाइम्स लिडरशिप समीट’ मध्ये दिली. 'कॅनडाचा पासपोर्ट आहे पण भारताचा नाही ?' असा सवाल त्याला भारतीयांकडून अनेकदा करण्यात आला. अक्षयने काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. पण, लोकसभा निवडणूकी दरम्यान त्यान मतदान केलं नाही. या गोष्टीवरुनही नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारवर चांगलाच निशाणा साधला होता. एका मुलाखती दरम्यान अक्षय म्हणाला, "मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. लोक मला अनेकदा यावरच प्रश्न विचारतात, टीका करतात आणि या गोष्टीचं मला वाईट वाटतं. मी भारतीय आहे हे सिद्ध करण्यासाठी मला आता एक कॉपी दाखवावी लागणार आह ते म्हणजे पासपोर्ट ! या एका गोष्टीमुळे मी दु:खी होतो. पण, लवकरच मला पासपोर्ट मिळणार आहे.'' 

पुढे तो म्हणाला, 'माझी पत्नी आणि मुलं भारतीयच आहेत. मला देशाविषयी आदर नसता तर, मी त्यांनादेखील कॅनडाचं नागरिकत्त्व घेण्यास भाग पाडलं असतं. मी कर (Tax) इथे भरतो, काम इथे करतो'. 

या सर्व प्रकारानंतर मात्र नेटकऱ्यांनी त्याला पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. अनेकांनी त्याच्यावर जोक्स आणि मीम्सही शेअर केले आहेत. 

अक्षयकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे कारण...
अक्षयकडे कॅनडाचं नागरिकत्त्व आहे आणि याविषयी मुलाखतीमध्ये अक्षय म्हणाला, 'बऱ्याच वर्षांपूर्वी माझे जवळपास 14 सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरले होते. म्हणून मी दुसऱ्या कामाचा विचार करत होतो. माझा एक मित्र कॅनडात राहत होता आणि त्याला मी हा सर्व प्रकार सांगितला. त्याने मला कॅनडात येऊन राहायला सांगितले आणि आपण एकत्र काम करु असं सांगितलं. त्यावेळी मी कॅनडाचा पासपोर्ट काढला. मला वाटलं माझं करीअर लवकरच संपुष्टात येणार आहे. पण माझ्या नशिबाने पुढचा पंधरावा सिनेमा हिट झाला.' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com