Akshay Kumar Indian Citizen : भारताचं नागरिकत्व मिळालं, आता निवडणूकीला उभं राहणार? अक्षयनं काय दिलं उत्तर?

ट्रोलर्सनं अक्षयला त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरुन जेव्हा दिसेल तेव्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Akshay Kumar Indian Citizenship now gossip entry
Akshay Kumar Indian Citizenship now gossip entry esakal
Updated on

Akshay Kumar Indian Citizenship now gossip entry : बॉलीवूडच्या खिलाडीला भारताचं नागरिकत्व जोपर्यत मिळत नव्हतं तोपर्यत त्याला नेटकऱ्यांनी हैराण केलं होतं. भलेही अक्षयनं भारतातील शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबवले असतीलही, मात्र त्याचा लोकांना सोयीप्रमाणं विसर पडला होता.

ट्रोलर्सनं अक्षयला त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरुन जेव्हा दिसेल तेव्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली. मुळचा कॅनडा देशाचा रहिवाशी असणाऱ्या अक्षयला आता भारताचे नागरिकत्व मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन त्याविषयी माहितीही दिली आहे. अक्षयची ती पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

मी भारतीय झालो असे म्हणत त्यांनी त्याला भारतीय संविधनानं दिलेल्या नागरिकत्वाच्या दाखल्याची प्रत दाखवत आनंद व्यक्त केला आहे. त्यावर त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे चाहत्यांनी आता ट्रोलर्सला बोलण्यासारखे काही राहिलेलं नाही असे म्हणत अक्षयवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मात्र यासगळ्यात आता अक्षय कुमार येत्या काळात निवडणूक लढवणार का असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. २०२४ च्या निवडणूकीत अक्षय सहभागी होणार का, तो निवडणूक लढवणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. २०१९ च्या निवडणूकांपूर्वी अक्षयनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. त्यात त्यानं विचारलेल्या प्रश्नांवरुन तो प्रचंड प्रमाणात ट्रोलही झाला होता.

Akshay Kumar Indian Citizenship now gossip entry
Gadar 2 Movie : 'बॉलीवूडमधील एक अभिनेता दाखवा जो.... !' सनीनं टाकला मोठा बॉम्ब

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण अक्षय कुमारचे सासरे हे कॉग्रेसचे खासदार होते. त्यांनी १९९१ मध्ये बीजेपीचे लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी अडवाणी यांचा पराभव केला होता. त्याच जागेवर पुन्हा झालेल्या निवडणूकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांनाही हरवले होते.

यासगळ्यात अक्षय कुमारची एक मुलाखत व्हायरल होत आहे. लल्लनटॉपशी बातचीत करताना त्यानं त्याच्या आगामी राजकीय प्रवासाविषयीच्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. अक्षय म्हणाला होता की, मला राजकारणात येण्यात काहीही रस नाही. मला असे चित्रपट करायचे आहेत की, ज्यातून मला देशसेवा केल्याचा आनंद मिळेल. आणि असे चित्रपट करण्यास मी प्राधान्य देणार आहे.

Akshay Kumar Indian Citizenship now gossip entry
Gadar 2 : सनीचा 'गदर' पाहायला 'नाना' गेले, तारा सिंगची डेरिंग पाहून 'योगी आदित्यनाथही' भारावले!

मला माझ्या चित्रपटांतून असे नागरिक तयार करायचे आहेत जे देशाच्या सेवेत मोलाचे योगदान देतील. राजकारणात मला तसे काही दिसत नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात जाण्याचा विचार करणार नाही. जिथं माझी गरज असेल तिथं मी नेहमीच सहकार्य करेल पण राजकारणात जाण्याचा विचार नाही. असे अक्षयनं यावेळी स्पष्ट केले होते.

अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाल्यापासून त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींनी सुरुवात झाली आहे.तो आता राजकारणात प्रवेश करणार आहे असे बोलले जात आहे. अशातच त्याच्या यापूर्वीच्या मुलाखती व्हायरल झाल्या आहेत. त्यातून त्यानं राजकीय प्रवासाविषयी सांगितले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com