अजित डोवाल यांच्या जिवनावर येणार चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आयुष्यावर एक सिनेमा तयार करण्यात येणार आहे. यात अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा अभिनेता अक्षय कुमार साकारणार असून नीरज पांडे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अजित डोवाल यांच्या करिअरवर तयार होणाऱ्या या सिनेमात त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांना दाखवण्यात येणार आहे. असं असलं तरी हा सिनेमा सुरू व्हायला बराच काळ लागणार आहे. याचं मुख्य कारण अक्षय कुमार सध्या 'मिशन मंगल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो 'सूर्यवंशी' सिनेमाचं चित्रीकरणही करत आहे.

या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर अक्षय लगेच बच्चन पांडे सिनेमाचं चित्रीकरण सुरू करणार आहे. याशिवाय निरज पांडेही अजय देवगण स्टारर 'चाणक्य' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असणार आहे. त्यामुळे ही कामे संपल्यावर अजित डोवाल यांच्या जिवनावरील चित्रपटावर काम करण्यास सुरवात करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar May Play NSA Ajit Doval In Neeraj Pandey’s Next Film