अक्षय कुमार 'बेलबॉटम' सिनेमाच्या शूटींगसाठी लंडनला उडन छू..

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 28 July 2020

अक्षयच्या 'बेलबॉटम' सिनेमाचं शूट पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे.या शूटींगसाठी सिनेमाची मुख्य टीम एका चार्टर्ड विमानाने रवाना होण्यासाठी तयार आहे.

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे हिंदी सिनेसृष्टीला पुन्हा एकदा रुळावर यायला थोडा वेळ लागत आहे. मात्र असं असलं तरी अभिनेता अक्षय कुमारने मात्र यात बाजी मारलीये. अक्षयच्या 'बेलबॉटम' सिनेमाचं शूट पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे.या शूटींगसाठी सिनेमाची मुख्य टीम एका चार्टर्ड विमानाने रवाना होण्यासाठी तयार आहे. या शूटींगआधी अक्षय देशातंच अनेक जाहीरातींच शूटींग करुन मोकळा झाला आहे.

हे ही वाचा: कोरोनाच्या परिस्थितीत पूनम पांडे करतेय लग्न

लंडनवरुन परतल्यानंतर अक्षय त्याच्या आगामी 'अतरंगी रे' आणि 'पृथ्वीराज' या आणखी दोन सिनेमांच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. अक्षय कुमार अनलॉक १ पासूनंच शूटींगसाठी सक्रिय झालाय. अक्षय हा पहिलाच अभिनेता आहे ज्याने लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच शूटींगची सुरुवात कोरोना व्हायरसच्या या महारोगराईच्या जागरुकतेच्या जाहीरातीपासून केली. त्यानंतर तो सतत इतर टीव्ही जाहीरांतीसाठी देखील शूटींग करत होता.

सुत्रांच्या माहितीनुसार नुकतंच त्याने बांद्रा येथील मेहबुब स्टुडियोमध्ये एका टीव्ही कर्मशिअल जाहीरातचं शूटींग पूर्ण केलं आहे. या जाहीरातीसोबतंच त्याने इतर सहा जाहीरांतीची शूटींग देखील पूर्ण केली आहे.

याशिवाय अक्षय आणि त्याची 'बेलबॉटम' सिनेमाची पूर्ण टीम सिनेमाचं शूटींग पूर्ण संपूवण्याच्या उद्देशानेच तयारीनिशी जात आहेत. सुरक्षेच्या कारणाने निर्मात्यांनी सगळ्या कलाकार आणि कर्मचा-यांची पूर्ण व्यवस्था केली आहे. अक्षयने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की 'हा एक नवा अनुभव आहे ज्यामुळे वेगळ्या प्रकारे काम करण्यासाठी आपण असहाय्य आहोत ज्याचा आपण कधी विचार देखील केला नव्हता. मी पून्हा कामावर परतल्याने आनंदी आहे पण हे देखील गरजेचं आहे की आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाची काळजी घेतली गेली पाहिजे. आशा आहे की सगळं काही व्यवस्थित पूर्ण होईल.'

याव्यतिरिक्त 'अतरंगी रे' या सिनेमाचं शूट ऑक्टोबरमध्ये मदुरैपासून सुरु होईल. त्यानंतर दिल्ली आणि मग मुंबईमध्ये याचं शूटींग होईल. अक्षय कुमारचे 'सूर्यवंशी' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' हे दोन सिनेमे रिलीजसाठी तयार आहेत तर 'पृथ्वीराज' सिनेमाचं शूटींग मध्येच रखडलं आहे आणि 'बच्चन पांडे' सिनेमाच्या शूटींगला अजुन सुरुवात झालेली नाही.   

akshay kumar ready for his upcoming movies shooting atrangi re prithviraj and bell bottom in london  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar ready for his upcoming movies shooting atrangi re prithviraj and bell bottom in london